Credit Score: चांगला क्रेडिट स्कोर असलेल्या लोकांना मिळतात हे 5 फायदे
सध्या अनेक जणांकडे क्रेडिट कार्ड आहे. अनेक जण व्यवहार करताना क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापराचा आपल्या सिबील स्कोरवर चांगला वाईट परिणाम होत असतो. याशिवाय आपण घेतलेल्या कर्जाचे हप्ते किती वेळेत भरतो यावर देखील क्रेडिट स्कोर अवलंबून असतो. ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांना काय फायदे मिळतात जाणून घ्या.
तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. साधारणपणे 750 पेक्षा जर तुमच्या क्रेडिट स्कोअर असेसलल तर तो चांगला मानला जातो. CIBIL स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज लवकर मंजूर होते. यासोबतच बँकेच्या दृष्टीने एक चांगले ग्राहक असतात. चांगला क्रेडिट स्कोर असण्याचे फायदे देखील मिळतात. काय आहेत ते फायदे जाणून घ्या.
उच्च क्रेडिट स्कोअर असण्याचे फायदे
कर्ज मंजूरी : तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला लवकर कर्ज मंजूर होते. तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला तर लगेचच तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळू शकते.
कमी व्याजदर: तुमच्या CIBIL स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला तुम्ही बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज मिळवता येते. तुम्ही तुमचे व्याजदर कमी करण्यासही बँकेला सांगू शकता.
उच्च क्रेडिट मर्यादा : जर तुमचा क्रेडिट स्कोर बराच काळ चांगला राहिला. तर त्याचा थेट फायदा तुम्हाला क्रेडिट कार्डमध्ये मिळतो. अनेक वेळा चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना बँका नेहमीपेक्षा जास्त क्रेडिट मर्यादा देतात.
ऑफर : चांगला CIBIL स्कोर असलेल्या ग्राहकांना बँका चांगल्या ऑफर देते. जे कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांना दिले जात नाही. चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना बँक प्रीमियम कार्ड ऑफर करते. यामध्ये त्यांना अनेक विशेष रिवॉर्ड पॉइंट्स आणि फायदे मिळतात.
विमा प्रीमियम : विम्याचा हप्ता निश्चित करण्यात देखील कंपन्या आता क्रेडिट स्कोअर देखील तपासतात. उच्च क्रेडिट स्कोअर असल्यास कंपन्या तुम्हाला कमी प्रीमियम देऊ शकतात. यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतात.