अंबानींच्या घरी काम करणारा कुक दुबई, स्पेन फिरला, म्हणाला, त्यांच्या घरी मी एकही..
अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळते. अंबानी कुटुंबिय नक्की काय खाते आणि त्यांची जीवनशैली नक्की कशी आहे, याबाबत लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अंबानी कुटुंबियांकडे जेवण तयार करणाऱ्या कुकने मोठा खुलासा केला.

अंबानी कुटुंबाबद्दल लोकांमध्ये मोठी क्रेझ आहे. अंबानी काय खातात, काय पितात याबाबत मोठे कुतूहल लोकांमध्ये आहे. अंबानींच्या घरी दररोज 600 लोक 24 तास काम करतात. विशेष म्हणजे घरातील लोकांना जे जेवण तयार केले जाते, तेच जेवण घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी असते. दररोज 400 पेक्षा अधिक चपात्या अंबानींच्या घरात बनतात. खास मोठे किचनही अंबानींच्या घरी आहे. जिथे अनेक लोक जेवण बनवण्याचे काम करतात. अर्चना सिंह सोशल मीडियावर सक्रिय आहे. व्लॉगिंगला सुरूवात केली. अर्चना पूरन सिंह कुटुंबासोबत व्लॉगिंक करताना दिसते. नुकताच अर्चना सिंह आपल्या कुटुंबासोबत दिल्लीत पोहोचली. अर्चना कुटुंबासोबत दिल्लीतील छोले भटुरे खाण्यासाठी पोहोचली. यादरम्यान ती दिल्लीतील पहाडगंज येथील एका रेस्टारंटमध्ये पोहोचली.
त्यावेळी रेस्टारंटच्या मालकाने तिचे स्वागत केले. आपल्या कर्मचाऱ्यांना अर्चना यांना भेटवताना रेस्टारंटचा मालक दिसला. सलमान खान, शाहरूख खान हेच नाही तर मुकेश अंबानी यांच्याही घरी जेवण तयार करण्याचे काम केल्याचे कुकने सांगितले. कुकने सांगितले की, तो दुबई, श्रीलंका, दुबई, स्पेन, फ्रान्स या देशातही फिरून आला.
हे ऐकून अर्चना सिंह यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्री म्हणाली की, या ठिकाणी मी पण कधी गेले नाही. कुकने अर्चनाला सांगितल की, मी अंबानींच्या घरी एक महिना सुद्धा राहिलो नाही. मी तिथे जेवण तयार करत होतो. यावेळी अर्चना यांनी त्यांना विचारले की, एंटीलिया आतमधून कसे आहे? यावर कुक म्हणाला की, एकदम मस्त. घरात विष्णु गार्डन आहे. ते एकदम छान आहे.
अंबानी कुटुंबात सणवार उत्सव जोरदार साजले केले जातात. अंबाीनी नक्की काय खातात, याबाबत लोकांना मोठे कुतूहल आहे. अंबानी कुटुंबिय घरगुती आणि साधे जेवण घेतात. गुजराती डाळीशिवाय त्यांचे जेवण पूर्ण होत नाही. गुजराती डाळ अंबानी कुटुंबियांच्या जेवणात असते म्हणजे असतेच. यासोबतच त्यांच्या जेवणात सलाड असते. वेगवेगळ्या भाज्या अंबानी कुटुंबियांच्या जेवणात असतात.
