AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री कुत्र्यांना खरोखरच भुते दिसतात म्हणून भुंकतात किंवा रडतात? जाणून घ्या काय आहे यामागील सत्य

काहींच्या मते रात्री कुत्रे खूप भुंकतात कारण त्यांना आत्मे, भुते दिसतात. किंवा काही दुर्घटना होणार असेल तर त्यांना आधीच जाणवतं असंही म्हटलं जातं. पण हे खरोखरंच असं असतं का? विज्ञान याबाबत काय म्हणतं हे जाणून घेऊयात.

रात्री कुत्र्यांना खरोखरच भुते दिसतात म्हणून भुंकतात किंवा रडतात? जाणून घ्या काय आहे यामागील सत्य
Do dogs really bark because they see ghosts? What exactly is the truth? Image Credit source: TV9 Gujarati
| Updated on: Aug 14, 2025 | 6:19 PM
Share

भुत-प्रेत-आत्मा यासर्व गोष्टींमध्ये काहीजणांचा विश्वास असतो तर काहींचा नसतो. त्याचसोबत अनेक लोक याबाबतच्या इतर गोष्टीं देखील मानतात. जसं अनेकांचा असा विश्वास असतो की रात्री कुत्रे भुंकतात किंवा रडतात त्यामागे देखील असंच काहीसं कारण मानतात. जसं की कुत्र्यांना रात्री आत्मे, भुते दिसतात म्हणून ते मोठ्याने भुंकतात किंवा रडतात. किंवा कोणतीतरी दुर्घटना घडणार असेल तरी कुत्रे रात्रीचे रडतात असंही म्हटलं जातं. पण हे खरंच असं असतं का? आणि याबाबत आणि विज्ञान याबद्दल काय म्हणतं? चला जाणून घेऊयात.

रात्री भूत आणि आत्मे पाहिल्यानंतर कुत्रे भुंकतात

कुत्रे हे दिवसापेक्षा रात्री जास्त भुंकताना दिसतात. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याशी संबंधित अनेक समजुती आहेत. असे म्हटले जाते की रात्री भूत आणि आत्मे पाहिल्यानंतर कुत्रे भुंकतात किंवा कोणाचा मृत्यू होणार असेल किंवा काही दुर्घटना घडणार असेल तर त्याची चाहुल आधीच कुत्र्यांना होते. म्हणून ते संकेत आपल्याला देण्यासाठी म्हणून ते रडतात किंवा भुंकतात असं म्हटलं जातं. त्यामुळे अनेक लोकांचा असा विश्वास आहे की रात्री कुत्रे भुते पाहिली की भुंकू लागतात.

कुत्र्यांना आत्मे दिसतात हे खरे असते का?

कुत्र्यांना आत्मे दिसतात हे खरे असते असं म्हटलं जातं. कारण त्यांच्या डोळ्यांमध्ये माणसांपेक्षा जास्त वेगाने पाहण्याची आणि खोल दृष्टी असते . ती पाहण्याची क्षमता असते. हेच कारण आहे की जेव्हा कुत्रे नकारात्मक ऊर्जा पाहतात तेव्हा ते भुंकायला लागतात.किंवा त्यांना ते संकेत लवकर जाणवतात.

याबाबत विज्ञान काय म्हणतं?

परंतु विज्ञान या दाव्यांवर अजिबात विश्वास ठेवत नाही.विज्ञानानुसार, कुत्रे रात्री भुंकतात कारण त्यांना एकटेपणा जाणवतो आणि ते त्यांची भीती व्यक्त करण्यासाठी म्हणून रात्री भुंकतात. विज्ञानानुसार, कुत्र्यांना मानवांपेक्षा जास्त संवेदनशील इंद्रिये असतात. त्यामुळे आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही किंवा जाणवू शकत नाही त्या गोष्टी कुत्र्यांना लगेच जाणवतात. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना भूत दिसतात.

कुत्र्यांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता

तसेच कुत्र्यांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता माणसापेक्षा तीव्र असते. त्याने लगेच वास आणि ऐकू येतं. त्यामुळे कुत्रे लगेच प्रतिक्रिया देतात. त्यामुळे अनेकदा कुत्रे रात्रीचे रडतातही.

कुत्रे भुंकण्याची किंवा रडण्याची इतर नैसर्गिक कारणे:

आवाज: कुत्रे त्यांच्या आजूबाजूच्या आवाजांना प्रतिसाद म्हणून भुंकू शकतात, जसे की इतर प्राणी, गाड्या, किंवा मानवी आवाज.

धोका किंवा भीती: कुत्रे एखाद्या अनोळखी व्यक्ती किंवा प्राण्याला पाहून किंवा धोकादायक परिस्थितीचा अंदाज आल्यास भुंकू लागतात

संवाद: कुत्रे इतर कुत्र्यांशी संवाद साधण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भुंकू शकतात.

एकटेपणा किंवा कंटाळा: एका रिसर्चनुसार काहीवेळा कुत्र्यांना एकटे वाटत असताना किंवा कंटाळा आल्यावर ते भुंकू लागतात.

वैद्यकीय कारणे: काहीवेळा कुत्रे आजारी असल्यामुळे किंवा त्यांना वेदना होत असल्यामुळेही भुंकू शकतात.

अंधश्रद्धा | भूत-पिशाच्च: काही लोकांचा असा विश्वास आहे की कुत्रे भुंकतात कारण त्यांना भूत किंवा आत्मा दिसतो, पण याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.