AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी चार लग्न होऊन एकही टिकले नाही; ‘या’ आहेत त्यांच्या पत्नी

सुप्रसिद्ध लेखक आणि बुकर पारितोषिक विजेते सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्याची जगभरात चर्चा होत आहे. सलमान रश्दी आपल्या लेखणीमुळे जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लग्नाच्या बातम्याही चर्चेत आल्या. सलमान रश्दी यांनी चार विवाह केले आहेत.

Salman Rushdie : प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी चार लग्न होऊन एकही टिकले नाही; 'या' आहेत त्यांच्या पत्नी
Salman RushdieImage Credit source: Tv9
| Updated on: Aug 13, 2022 | 4:12 PM
Share
  1. सुप्रसिद्ध लेखक आणि बुकर पारितोषिक विजेते सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्याची जगभरात चर्चा होत आहे. सलमान रश्दी आपल्या लेखणीमुळे जितके चर्चेत राहिले तितकेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे लग्नाच्या बातम्याही चर्चेत आल्या. सलमान रश्दी यांनी चार विवाह केले आहेत. क्लेरिसा लुआर्ड, मारियन विगिन्स, एलिझाबेथ वेस्ट आणि सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मी यांच्यासोबत त्याच्या लग्नाच्या आणि विभक्त झाल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या.
  2. पहिला विवाहः सलमान रश्दी यांचे पहिले लग्न 1976 मध्ये क्लॅरिसा लुआर्डसोबत झाले होते. त्यांना जफर नावाचा मुलगा आहे. दोघांची पहिली भेट 1969 मध्ये एका कॉन्सर्टमध्ये झाली होती. क्लॅरिसाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात लंडनमधील एका प्रकाशन गृहात प्रसिद्धी व्यवस्थापक म्हणून केली. भेटीच्या एक वर्ष आधी दोघांचे ब्रेकअप झाले होते. कलेच्या क्षेत्रात काम करत असताना सलमान आणि क्लॅरिसा एकमेकांच्या जवळ आले आणि प्रेमात पडले. लग्न झाले आणि 1979 मध्ये मुलगा जफरचा जन्म झाला.काही काळानंतर दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या आणि 1987 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर 1979 मध्ये क्लेरिसाचा मृत्यू झाला.
  3. दुसरा विवाह: सलमानचे दुसरे लग्न 1988 मध्ये अमेरिकन कादंबरीकार मारियन विगिन्ससोबत झाले. क्लॅरिसापासून वेगळे झाल्यानंतर सलमानने लंडनमध्ये विगिन्ससोबत एक नवीन सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा सलमान त्याच्या पुस्तकामुळे वादात आला होता. इराणच्या धार्मिक नेत्याने त्यांच्याविरोधात फतवा काढला होता. या वादामुळे विगिन्स आणि सलमान बराच काळ लपून बसले होते. दोघेही जवळपास 5 वर्षे एकत्र राहिले आणि 1993 मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. 1993 मध्ये, विगिन्स यांना त्यांच्या कादंबरीसाठी हिडिंगर काफ्का पुरस्कार मिळाला.
  4. तिसरे लग्न : सलमानचे तिसरे लग्न लेखिका एलिझाबेथ वेस्टसोबत झाले होते. दोघांनी 1997 मध्ये लग्न केले. वेल्सच्या ग्रामीण भागावर आधारित एलिझाबेथच्या पुस्तकाची खूप चर्चा झाली. सलमान आणि एलिझाबेथ वेस्ट यांनी मिररवर्क – 50 इयर्स ऑफ इंडियन रायटिंग 1947-1997 हे पुस्तक एकत्र लिहिले. काही काळानंतर या दोघांपासून एक मुलगा झाला, त्याचे नाव मिलन रश्दी. लग्नाच्या 7 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये सलमान आणि एलिझाबेथचा घटस्फोट झाला.
  5. चौथे आणि सर्वात जास्त चर्चेत असलेले लग्न: सलमानचा चौथा सुपरमॉडेल पद्मा लक्ष्मीसोबत होता. त्यांच्या लग्नाची ही सर्वाधिक चर्चा होती. एलिझाबेथपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही दिवसांनी पद्मा लक्ष्मीशी लग्न केले. दोघांचे फोटो आणि लव्ह लाईफ जगभर चर्चेत होते. अमेरिकन मॉडेल पद्मा लक्ष्मीनेही हे पुस्तक लिहिले जे लो-फॅट रेसिपीवर आधारित होते. या पुस्तकामुळे त्यांचा करिअरचा आलेख झपाट्याने वाढला.
  6. 3 वर्षांत घटस्फोट: पद्मा लक्ष्मीची कारकीर्द उंचीवर पोहोचली आणि 2006 मध्ये शेफ कुकिंग स्पर्धेची जज बनली. सलमान रश्दीचा चौथा घटस्फोट पुढच्याच वर्षी म्हणजे 2007  मध्ये झाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.