Friendship Day 2022: ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे? इतिहास आणि महत्त्व

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही मित्र असतात. वय, लिंग, जातपात, श्रीमंत-गरीब या सर्वांच्या पलीकडे मैत्रीचे नाते  असते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे भारतात कायमच उदाहरण दिले जाते.  मैत्रीची भावना विश्वास, एकता आणि उत्साहपूर्ण आयुष्य जगण्याला प्रोत्साहित करते.

Friendship Day 2022: ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच का साजरा केला जातो फ्रेंडशिप डे? इतिहास आणि महत्त्व
मैत्री दिवस Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 8:51 AM

Friendship Day 2022: फ्रेंडशिप डे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. भारतासह अनेक देश आपापल्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करतात. यावेळी आज 7 ऑगस्टला  मैत्रीचा हा खास दिवस साजरा होत आहे. नावाप्रमाणेच फ्रेंडशिप डे हा मैत्रीला समर्पित दिवस आहे. या दिवशी लोकं त्यांच्या मित्रांसोबत पार्टी करतात, फिरतात आणि त्यांची मैत्री साजरी करतात. मदर्स डे किंवा फादर्स डे सारखा फ्रेंडशिप डे साजरा करण्याची परंपरा आहे. पण फ्रेंडशिप डे साजरा करणाऱ्या लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की मित्रांसाठी खास दिवस साजरा करण्यामागचे कारण काय?  पहिल्यांदा फ्रेंडशिप डे कधी आणि का साजरा करण्यात आला? फ्रेंडशिप डेचा इतिहास काय आहे? (history of friendship day) आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे? (Importance of friendship day) 7 ऑगस्ट 2022 रोजी मैत्री दिन साजरा करण्यापूर्वी, या दिवसाचा इतिहास आणि फ्रेंडशिप डेशी संबंधित मनोरंजक गोष्टी जाणून घेऊया.

पहिला फ्रेंडशिप डे कधी साजरा करण्यात आला होता?

1935 मध्ये पहिल्यांदा फ्रेंडशिप डे साजरा करण्यात आला. हा दिवस अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात साजरा करण्यात आला. मैत्रीचे प्रतीक म्हणून फ्रेंडशिप डे साजरा केला जाऊ लागला, त्यानंतर हा दिवस जगभरात फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.

फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागचे कारण?

फ्रेंडशिप डे साजरा करण्यामागे एक गोष्ट सांगण्यात येते. अमेरिकेत 1935 मध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे अमेरिकन सरकारचा हात असल्याची चर्चा होती. मृत व्यक्तीचा एक प्रिय मित्र होता. जेव्हा त्याला त्याच्या मित्राच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा तो खूप निराश झाला. मित्र गमावल्यामुळे त्या व्यक्तीनेही आत्महत्या केली. मैत्रीचे हे रूप पाहून अमेरिकन सरकारने ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. हळूहळू हा दिवस प्रचलित झाला आणि भारतासह इतर अनेक देशांमध्ये ऑगस्टचा पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जाऊ लागला.

हे सुद्धा वाचा

तारखेबद्दल अनेकांना संभ्रम

फ्रेंडशिप डे 30 जुलैला की ऑगस्टच्या पहिल्या रविवारी याबद्दल अनेकांना संभ्रम आहे.   वास्तविक, 1930 मध्ये, जॉयस हॉलने ते हॉलमार्क कार्डच्या रूपात तयार केले. नंतर 30 जुलै 1958 रोजी अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणून घोषित करण्यात आले. पण भारतासह बांगलादेश, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारीच मैत्री दिन साजरा करतात.

मैत्री दिनाचे महत्व

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही मित्र असतात. वय, लिंग, जातपात, श्रीमंत-गरीब या सर्वांच्या पलीकडे मैत्रीचे नाते  असते. कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे भारतात कायमच उदाहरण दिले जाते.  मैत्रीची भावना विश्वास, एकता आणि उत्साहपूर्ण आयुष्य जगण्याला प्रोत्साहित करते. मैत्रीच्या नात्याचे महत्त्व नव्या पिढीला कळावे तसेच या दिवसाच्या निमित्याने आपल्या मित्रांशी संपर्क व्हावा म्हणून दरवर्षी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.