यंदा फ्रेंडशिप डेला करा ‘हे’ 5 ॲडव्हेंचर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, मैत्रिचं नातं होईल अधिकच घट्ट
मैत्रीचे नाते खूप खास असते. जर तुम्ही या फ्रेंडशिप डेला मित्रांसोबत काहीतरी नवीन आणि रोमांचक करण्याचा विचार करत असाल, तर ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हा एक चांगला पर्याय असू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण अशाच काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स बद्दल जाणून घेऊयात. जे तुमचं मैत्रीच नातं खूप घट्ट करू शकते.

मैत्रीचे नाते सर्वात खास असते. या नात्यात मजा, आठवणी आणि खूप काही असते. जेव्हा जेव्हा आपण आपल्या जिवलग मित्रासोबत वेळ घालवतो तेव्हा तो क्षण संस्मरणीय असतो. अशातच जर तुम्हीही यावेळी मित्रांसोबत काहीतरी नवीन, रोमांचक आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा विचार करत असाल, तर ॲडव्हेचर स्पोर्ट्स हा एक उत्तम पर्याय असू शकतो. तसेच मित्रांसोबत प्रवास करण्याची मज्जाच वेगळी असते.
कधी मित्रांसोबत ट्रेकला जाणे किंवा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणे असे अनुभव मनाला ताजेतवाने करतातच, शिवाय मित्रांसोबत घालवलेले क्षण आणखी खास बनवतात. जर तुम्हाला तुमच्या मैत्रीला एक नवीन अनुभव द्यायचा असेल, तर काही ॲडव्हेंचर स्पोर्ट्स जे मित्रांसोबत नक्कीच करायला हवेत. यामुळे मजा तर द्विगुणीत होईलच, पण तुमचे नातेही अधिक घट्ट होईल.
फ्रेंडशिप डे निमित्त तुम्ही मित्रांसोबत या रोमांचक ट्रिपचे नियोजन करू शकता. तर आता येणाऱ्या फ्रेंडशिप डे निमित्त तुम्ही मित्रांसोबत कोणते ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करू शकता हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
स्कूबा डायव्हिंग
स्कूबा डायव्हिंगसाठी अंदमान हे चांगले ठिकाण आहे. समुद्राच्या खोलवर रंगीबेरंगी मासे आणि कोरल पाहणे स्वप्नासारखे आहे. अंदमान व्यतिरिक्त तुम्ही गोवा आणि लक्षद्वीपमध्ये देखील स्कूबा डायव्हिंग करू शकता. मित्रांसोबत हा अनुभव आणखी मजेदार करू शकता.
ट्रेकिंग
ट्रेकिंग करताना मित्रांची साथ असली की एक वेगळीच मज्जा येते. डोंगर रांगामधून चढताना आणि तिथून दिसणारे दृश्य पाहणे ही एक वेगळीच मजा आहे. मित्रांसोबत ट्रेकिंग करणे थकवणारे असले तरी वाटेत मिळणारी मजा इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगळीच असते.
बंजी जंपिंग
जर तुमच्या मित्रांचे मन मजबूत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत बंजी जंपिंग देखील करू शकता . दोरीचा वापर करून उंचीवरून खाली उडी मारणे हे रोमांचक असण्यापेक्षा जास्त भयानक वाटू शकते. तर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बंजी जंपिंग करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही ऋषिकेशला जाऊ शकता, जिथे भारतातील सर्वात उंच बंजी जंपिंग साइट आहे.
झिप लाईनिंग
एका टेकडीवरून दुसऱ्या टेकडीकडे जाताना हवेत एका विशिष्ट दोरीवरून चालत जाणे याला झिप लाइनिंग म्हणतात. मित्रांसोबत हे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी शेअर केल्याने तुमचा प्रवास संस्मरणीय होईल.
कॅम्पिंग आणि बोनफायर
जंगलात किंवा डोंगरात कॅम्पिंग करणे हे खूप मजेदार असू शकते. कारण यात तुम्ही एकत्र येऊन रात्रभर गप्पा गोष्टी करणे, तसेच शेकोटीभोवती बसून गाणी गाणे, हे क्षण आयुष्यभरासाठी संस्मरणीय बनतात.
