AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरील झाकणं का असतात रंगबिरंगी? लाल, निळ्या, हिरव्या झाकणांचा अर्थ तरी काय? वाचून बसेल धक्का

Colourful lids of Drinking Water Bottles: भारतात बाटलीबंद पाण्याचा मोठा व्यवसाय आहे. दिग्गज कंपन्या या व्यवसायात उतरलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरील झाकणाकडं कधी तुम्ही निरखून पाहिलंय का? का असतात झाकणं रंगबिरंगी, काय आहे लाल, निळ्या, हिरव्या झाकणांचा अर्थ तरी?

GK: पिण्याच्या पाण्याच्या बाटलीवरील झाकणं का असतात रंगबिरंगी? लाल, निळ्या, हिरव्या झाकणांचा अर्थ तरी काय? वाचून बसेल धक्का
या झाकणांचं खोल अर्थImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 19, 2026 | 4:03 PM
Share

Colourful lids of Drinking Water Bottles: भारतात बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय कोट्यवधींच्या घरात आहे. प्रवासात, बाहेरगावी जाताना आपण दुकानातून बाटलीबंद पाणी विकत घेतो. स्थानिक कंपन्यांसह अनेक दिग्गज खेळाडू या व्यवसायात आहेत. पाण्याची बॉटल विकत घेतल्यावर तिच्या झाकणकडं आपलं सहज लक्ष जातं. ही झाकणं रंगबिरंगी असतात. पण केवळ फॅशन म्हणून ही झाकणं विविध रंगांची नसतात. तर त्यामागे महत्त्वाचा संकेत असतो. तुम्ही अनेकदा बाटलीबंद पाणी पिले असेल पण या झाकणांच्या विविध रंगांविषयी अजूनही तुम्हाला ही माहिती नक्कीच नसेल.

पांढऱ्या रंगाचं झाकण: हे प्रक्रिया केलेले अथवा प्युरिफाईड पाणी असते. हे पाणी विविध स्त्रोतातून सीलबंद पाण्याच्या फॅक्टरीत येते. तिथे आरओ अथवा युव्ही या प्रक्रियेतून ते पाणी शुद्ध केले जाते. ज्या बाटलीवर पांढऱ्या रंगाचं झाकण असते, ते पाणी प्रक्रिया केलेले असते. बाजारात हे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यावेळी तुम्ही पांढऱ्या रंगाच्या झाकणाची खरेदी कराल, तेव्हा ते प्रक्रिया केलेले पाणी आहे हे लक्षात ठेवा.

निळ्या रंगाचं झाकण: ज्या पाण्याच्या बॉटलवर निळ्या रंगाचं झाकण असतं. त्यात स्प्रिंग वॉटर अथवा नैसर्गिक झऱ्यांचं शुद्ध पाणी असते. डोंगर अथवा भूगर्भातून हे पाणी बाटलीबंद करण्यात येते आणि त्याची विक्री होते. हे पाणी खनिजयुक्त असल्याने शरीराला ताजेतवाणे करते.

लाल रंगाचं झाकण: लाल रंगाचं झाकण असलेली पाण्याची बॉटल तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. कारण या पाण्यात कार्बोनेटेड अथवा सोडा वॉटर असते. काही खास औषधी गुणधर्म म्हणून त्याचा वापर होतो. काही देशांमध्ये या पाण्याचा वापर करण्यात येतो.

काळ्या रंगाचं झाकण: बाजारात काळ्या रंगाचं झाकण असलेली पाण्याची बॉटलही मिळते. हे पाणी अल्कलाईन असते. त्याला ब्लॅक वॉटर असं म्हणतात. खासकरून खेळाडूंच्या हातात तुम्ही काळ्या रंगाच्या झाकणाची बॉटल पाहिली असेल. या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि मुबलक नैसर्गिक खनिजं असतात. फिटनेस ट्रेनरकडे सुद्धा ही पाण्याची बॉटल दिसते.

पिवळ्या रंगाचं झाकण: दातांच्या अथवा हाडांच्या तक्रारींसाठी या पाण्याचा अधिक वापर होतो. शरीरातील विशिष्ट खनिजाचं संतुलन राहावं यासाठी पिवळ्या रंगाचं झाकण असलेली पाण्याची बॉटल पिण्यास दिली जाते. हे पाणी फ्लोराईडयुक्त असते.

Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?