AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शोले’ ची झाली होती जेथे शुटींग, तेथील ही 5 ठिकाणे पाहिली आहेत का ?

‘शोले’ चित्रपटाने हिंदी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच इतिहास निर्माण केला आहे. हा चित्रपट अजूनही लोकांच्या हृदयात आहे. त्याच्यातील अभिनेत्यांचे अभिनय ते त्यांच्या डायलॉगपर्यंत... प्रत्येक फ्रेमने या चित्रपटाला अमर बनवले आहे. शोलेचे चित्रीकरण झालेले ‘रामगड’ कुठे आहे तेथील पाच पर्यटन स्थळे पाहूयात..

‘शोले’ ची झाली होती जेथे शुटींग, तेथील ही 5 ठिकाणे पाहिली आहेत का ?
Sholay film shooting took place in Ramgad
| Updated on: Nov 26, 2025 | 11:10 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीतील शोले चित्रपटाला माईल स्टोन म्हटले जाते. या चित्रपटाला ब्लॉकबस्टर बनवणारे काही कलाकार आज जगात नाहीत. त्यातील वीरुची भूमिका करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचे नुकतेच निधन झाले आहे. धर्मेंद्र यांचा वयाच्या ८९ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. शोले चित्रपटातील अभिनेते, डॉयलॉग्ससोबत आणखी एक गोष्ट गाजली ती म्हणजे रामगड हे गाव…

गाजलेल्या शोले चित्रपटातील हे रामगड प्रत्यक्षात कर्नाटकातील रामनगर आहे. या गावात शोलेचे चित्रीकरण झाले होते. आजही या गावात शोलेचे चाहते शुटींगची स्थळे पाहायला गर्दी करतात. परंतू या रामनगरच्या आजबाजूलाही अनेक पर्यटनासाठी चांगली ठिकाणे आहेत. ज्यास तुम्ही एक्सप्लोर करु शकता. चला तर पाहूयात शोलेची शुटींग झाली त्या ( रामगड ) रामनगरच्या शेजारील चांगली स्थळे कोणती ?

कर्नाकटच्या रामनगरची खासीयत

शोलेचे रामगड म्हणजे रामनगर आता कसे दिसते आणि याचे काय वैशिष्टये आहे. ही जागा नैसर्गिक दरी आणि डोंगराळ कडे कपारीचा प्रांत आहे.हे गाव मंदिर आणि शांत परिसरासाठी ओळखला जातो. येथे शोलेची शुटींग लोकेशन पाहाता येतात. तसेच ट्रेकिंग, मंदिर दर्शन आणि ऐतिहासिक स्थळांचे मिश्रण आहे.आजही ही जागा शांत आहे. परंतू आता येथे नव्या इमारती झाल्या आहेत. त्यामुळे ही जागा सुंदर दिसते. याच्या जवळील पाच ठिकाणे पाहूयात…

येथे पोस्ट पाहा –

रामदेवरा बेट्टा

रामनगरच्या जवळच लोकप्रिय असा रामदेवरा बेट्टा नावाचा डोंगर आहे. हा नैसर्गिक दृश्ये आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. येथे डोंगरावर भगवान रामाचे एक तिर्थस्थळ आहे. येथे येण्यासाठी शिखरापर्यंत डोंगर चढावा लागतो, तो एक वेगळाच अनुभव आहे. येथे पोहचल्यानंतर निसर्गाचे वेगळेच रुप दिसते. डोंगरावर रामदेवरा बेट्टा गिधाडांचे अभयारण्य देखील असून ते पाहण्यासारखे आहे.रामनगर ते रामदेवरा बेट्टा हे अंतर केवळ २.५ किमी आहे.

श्री रेवन्ना सिद्धेश्वर बेट्टा टेकड्या

श्री रेवन्ना सिद्धेश्वर बेट्टा हिल्स या एसआरएस ३००० फूट उंचीवर स्थित एक अद्भूत स्थळ आहे. हे ठिकाण ओबडधोबड रस्ते आणि शानदार निसर्ग सौदर्यसाठी ओळखले जाते. डोंगरा ट्रेकिंग आणि नेचर लव्हरसाठी हे योग्य ठिकाण आहे. येथे श्री रेवन्ना सिद्धेश्वराचे मंदिराचे दर्शन घेऊ शकता. रामनगर श्री रेवन्ना सिद्धेश्वर बेट्टा डोंगर सुमारे १५ किमीवर आहे.

कब्बालादुर्ग किल्ला

कब्बालादुर्ग किल्ला कपल्ससाठी चांगले ठिकाण आहे. कब्बालादुर्ग ठिकाण कब्बालू गावाच्या जवळ एका ओबडधोबड खंडहर झालेला किल्ला आहे. ट्रेक करुन तुम्ही येथे पोहचू शकता. येथे किल्ल्यावरुन नजारा छान दिसतो. शिखरावर तुम्हाला मंदिरे आणि दुर्गम किल्ल्यात शांत वातावरण मिळेल. येथीस सनसेट देखील सुंदर दिसतो.हा किल्ला ऐतिहासिक आहे. हे एक कमी गर्दीचे शांत ठिकाण आहे.

येथे पोस्ट पाहा –

चुन्ची फॉल्स

कनकपुराजवळ चुन्ची फॉल्स का एक सुंदर धबधबा आहे. याच्या आजुबाजूला घनदाट जंगल असून येथील हा धबधबा नैसर्गिक सौदर्यात भर टाकतो. येथे तुम्ही काही क्षण निवांतपणात वेळ घालवू शकता. मान्सूनमध्ये येथील सौदर्य दृष्ट लागण्या जोगे असते. गर्दीपासून दूर असलेल्या या ठिकाणी तुम्ही फोटोग्राफीची हौस पूर्ण करु शकता.

शोले शूटिंग प्वॉईंट

रामनगरला आला तर शोले चित्रपटाचे शूटिंग प्वाइंट अवश्य पाहा. येथील अनेक स्थळे तुम्हाला शोले चित्रपटातील लोकप्रिय सीनची आठवण करुन तुमच्या स्मृती जागृत करतील. येथील खडकात गब्बरचा आवाज घुमला होता.येथील डोंगर दऱ्यात गब्बर आणि ठाकूरचे डायलॉग घुमले होते याची आठवण तुम्हाला येईल. त्यामुळे जीवनात एकदा तरी येऊन हे स्थळ पाहूनच घ्या…

भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल
ॐ, स्वस्तिकची 'पंजा'शी तुलना करताच तुषार भोसलेंचा सपकाळांवर हल्लाबोल.
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा
शिंदे सेना-भाजपात भडका, संजय शिरसाट यांचा रवींद्र चव्हाणांना थेट इशारा.