AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्मचार्‍यांना प्रत्येक रेल्वेतून प्रवास मोफत? उत्तर वाचून बसेल धक्का

Railway Employee Pass: रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो का? त्यांना देशभरात कुठे गेले तरी तिकिटासाठी पैसे द्यावे लागत नाही का? तुमच्याही मनात हा प्रश्न आला असेल? काय आहे त्याचे उत्तर? रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत याविषयीची मोठी माहिती दिली.

कर्मचार्‍यांना प्रत्येक रेल्वेतून प्रवास मोफत? उत्तर वाचून बसेल धक्का
| Updated on: Jul 31, 2026 | 4:22 PM
Share

रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक रेल्वेतून मोफत प्रवास करता येतो असा अनेक लोकांचा समज आहे. त्यांच्या कुटुंबियांनाही तिकीट लागत नाही असे काहींना वाटते. त्यांनी प्रत्येक दिवशी जरी प्रवास केला तर त्यांना तिकीट लागत नाही. देशभरात ते कुठेही मोफत प्रवास करू शकतात, असा एक समज आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी अनेक प्रकारचे पास देण्यात येतात. पण याचा अर्थ ते कुठेही रेल्वेने मोफत प्रवास करू शकतात असा नाही. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि पास सुविधेची माहिती दिली. त्याविषयीचे नियम स्पष्ट केले.

रेल्वे कर्मचारी (पास) नियम, 1986 अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे पास देण्यात येतात. यामध्ये प्रिव्हलेज पास, ड्युटी पास, निवृत्तीनंतर कॉम्प्लिमेंट्री पास सारख्या सोयी सुविधा दिल्या जातात. या पासचा फायदा कर्मचारी आणि त्यांच्या पात्र कुटुंबातील सदस्यांना होतो. त्यांना काही ट्रेनमधील प्रवासाचा फायदा होतो.

कोणत्या ट्रेनमध्ये रेल्वे पासला ग्रीन सिग्नल?

वंदे भारत एक्सप्रेस

राजधानी एक्सप्रेस

शताब्दी एक्सप्रेस

दुरंतो एक्सप्रेस

हमसफर एक्सप्रेस

गतिमान एक्सप्रेस

भारतीय रेल्वेनुसार, वंदे भारत आणि गतिमान एक्सप्रेस या शताब्दी श्रेणीच्या समकक्ष ट्रेन आहेत. कर्मचारी कोणत्या बोगीतून प्रवास करू शकतील हे त्यांचे पद, वेतन मर्यादा आणि हुद्दा यावर अवलंबून असते. रेल्वे पास प्रत्येक ट्रेनमध्ये लागू होत नाही. खासकरून लक्झरी आणि टुरिस्ट ट्रेनमध्ये पासचा वापर करता येत नाही.

महाराजा एक्सप्रेस

पॅलेस ऑन व्हील्स

या ट्रेनचे व्यवस्थापन खास करून IRCTC आणि राज्य पर्यटन विकास संस्थांकडून करण्यात येते. त्यासाठी कर्मचाऱ्यांना रेल्वे पास नियमांची कोणतीही खास सुविधा दिली जात नाही. अशा रेल्वेत सामान्य प्रवाशांप्रमाणे तिकीट खरेदी करून कर्मचारी प्रवास करू शकतात.

काय आहे पूर्ण नियम?

नियमानुसार, मोफत प्रवासाची सुविधा केवळ ठराविक रेल्वेत मिळते. प्रत्येक रेल्वेत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येत नाही. लक्झरी आणि पर्यटनशी संबंधित ट्रेनमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना तिकीट खरेदी करावे लागते. याशिवाय प्रिव्हिलेज तिकिट ऑर्डरतंर्गत (PTO) रेल्वे कर्मचाऱ्यांना भाडे, किरायाचा एक वाटा म्हणजे जवळपास एक तृतीयांश पेमेंट देय असते.

Follow Us
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड