AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संस्कृतमधील ‘या’ शब्दांचं विदेशी सेलिब्रिटींना वेड, जाणून घ्या नेमका अर्थ काय ?

भारतीय भाषेतील टॅटूसुद्धा विदेशी लोकांना आकर्षित करत आहेत. अनेक सेलिब्रिटींचे भारतीय भाषांमध्ये आपल्या शरीरावर टॅटू काढून घेतले आहे.

संस्कृतमधील 'या' शब्दांचं विदेशी सेलिब्रिटींना वेड, जाणून घ्या नेमका अर्थ काय ?
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 8:34 PM
Share

मुंबई : असं म्हणतात की भारतीय संस्कृती जगातील सर्वांत जुन्या संस्कृतींपैकी एक आहे. याच कारणामुळे भारतीय सण, उत्सव तसेच साहित्य आणि भाषा याकडे विदेशी लोकसुद्धा आकर्षित होतात. अनेक विदेशी सेलिब्रिटींना भारतीय राहणीमान आवडते. अनेक विदेशी लोक तर आपल्या भारतीय भाषा शिकण्यासाठी अतोनात प्रयत्न करताना दिसतात. याच दरम्यान भारतीय भाषेतील टॅटूंनीसुद्धा विदेशी लोकांना वेड लावले आहे. अनेक सेलिब्रिटींनी भारतीय भाषांमध्ये आपल्या शरीरावर टॅटू काढून घेतले आहे. (know meaning of Sanskrit Anuugacchati Pravaha tattoo which is also tatto of Katty Parry)

कॅटी पेरीने गोंदवलं ‘अनुगच्छतु प्रवाह’ 

सध्या देश तसेच विदेशात संस्कृत भाषेतील एक टॅटू ट्रेंडिंगवर आहे. अनेक विदेशी सेलिब्रिटींनी हा टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतला आहे. ‘अनुगच्छतु प्रवाह’ या नावाचा टॅटू भारतीय लोक तसेच विदेशी लोक आनंदाने आपल्या शरीरावर गोंदवून घेत आहेत. प्रसिद्धा गायिका तसेच गीतकार कॅटी पेरी हिनेसुद्धा ‘अनुगच्छतु प्रवाह’ नावाचा हा टॅटू आपल्या शरीरावर काढला आहे. या टॅटूसोबतचे तिचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कॅटी पेरीने आपल्या उजव्या हातावर हा टॅटू काढला आहे.

View this post on Instagram

A post shared by KATY PERRY (@katyperry)

‘अनुगच्छतु प्रवाह’ टॅटूची सगळीकडे चर्चा

संकृत भाषेतील ‘अनुगच्छतु प्रवाह’ हा टॅटू सध्या चर्चेचा विषय़ ठरला आहे. देश तसेच विदेशातील लोक हा टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेत आहेत. भारतात तर ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहलेले अनेक टी-शर्टसुद्धा बाजारात आले आहेत.

‘अनुगच्छतु प्रवाह’ चा अर्थ काय ?

‘अनुगच्छतु प्रवाह’ नाव लिहलेल्या टॅटूची सध्या सगळीकडे चर्चा होत असल्यामुळे या नावाचा अर्थ काय ? हा प्रश्न अनेकांना पडतोय. हा शब्द संस्कृत भाषेतील असून त्याचा अर्थ हा प्रवाहासोबत पुढे चालणे, न थांबता प्रवाहासोबत वाटचाल करणे असा आहे.

दिग्गजांनी शरीरावर गोंदवले टॅटू

दरम्यान कॅटी पेरी हिनेच भारतीय भाषेत टॅटू गोंदवून घेतला आहे असे नाही. तर अनेक विदेशी सेलिब्रिटींनीसुद्धा हिंदी किंवा संस्कृत भाषेत शरीरावर गोंदवून घेतले आहे. यामध्ये Rihanna, David Beckham, Vanessa Hudgens, Miley Cyrus, Tommy Lee Brittany Snow, Jessica Alba, Alyssa Milano, Adam Levine अशा दिग्गजांचा समावेश आहे.

इतर बातम्या :

Video | गाडी पार्क करुन ऐटीत निघाला, मध्येच कुत्र्याची एन्ट्री केली अन् भलतंच घडलं, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | मोनालिसाचा न्याराच थाट, निळ्या साडीत घोड्यावर बसून शाही रपेट, व्हिडीओ एकदा पाहाच

Video | मुलाने गायलं गोड गाणं, बोबडे बोल नेटकऱ्यांच्या काळजाला भिडले, व्हिडीओ व्हायरल

(know meaning of Sanskrit Anuugacchati Pravaha tattoo which is also tatto of Katty Parry)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.