Know This : सप्टेंबर महिना संपत आला, तरी पाऊस काही संपेना, देशभर सुरु असलेल्या पावसाचं नक्की कारण काय?

ऑक्टोबर महिना तोंडावर आलेला असतानाही पाऊस सुरुच आहे. त्यामुळेच प्रश्न पडतो की, आता असं काय झालं आहे की सतत पाऊस पडत आहे. याच्याच कारणांबद्दल आज आम्ही तु्म्हाला माहिती देणार आहोत.

Know This : सप्टेंबर महिना संपत आला, तरी पाऊस काही संपेना, देशभर सुरु असलेल्या पावसाचं नक्की कारण काय?
प्रातिनिधिक फोटो

सप्टेंबर महिना आता संपत आला आहे, मात्र तरीही आतापर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनचा प्रभाव कायम आहे. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक आणि इतर काही राज्यात खूप मुसळधार पाऊस पडत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा प्रभाव संपत असतो आणि पाऊस थांबतो, मात्र, यावेळी तसं झालेलं दिसत नाही. ऑक्टोबर महिना तोंडावर आलेला असतानाही पाऊस सुरुच आहे. त्यामुळेच प्रश्न पडतो की, आता असं काय झालं आहे की सतत पाऊस पडत आहे. याच्याच कारणांबद्दल आज आम्ही तु्म्हाला माहिती देणार आहोत. ( Know This, What exactly is the reason for heavy rains to continue across the country even in the month of September? )

गुलाब वादळाचा परिणाम होतो का?

देशाच्या अनेक भागात ‘गुलाब’ चक्रीवादळाचा प्रभाव पाहायला मिळतो आहे. त्यामुळेच अनेक राज्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गुलाब हे चक्रीवाद रविवारी दक्षिण किनारपट्टीला धडकलं आणि आंध्र प्रदेशसह ओडिसातीह जोरदार पाऊस सुरु झाला. अजूनही हे वादळ सक्रीय अजून येत्या 2 दिवसांत महाराष्ट्रातही वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम

तसं पाहायला गेलं तर सप्टेंबर हा मान्सूनचा शेवटचा महिना. मात्र, गेल्या काही वर्षांत मान्सूनचं चक्र बदललेलं पाहायला मिळतं आहे. जून-जुलै महिन्यात आधी जिथं चांगला पाऊस व्हायचा, तिथं आता फारसा पाऊस होत नाही. जर आपण महाराष्ट्र, गोवा, कोकणात या महिन्यांत चांगला पाऊस झाला, मात्र मराठवाडा आणि विदर्भ कोरडाच होता. मात्र, आता मराठवाडा आणि विदर्भातही सप्टेंबर महिन्यात पाऊस कोसळत आहे. याला कारण, सध्या अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे पट्टे.

तसं पाहायला गेलं तर, आधी केवळ बंगालच्या उपसागरातच कमी दाबाचे पट्टे तयार होत असायचे, आणि त्यामुळे बहुतांश वादळं ही याच क्षेत्रात यायची. मात्र गेल्या काही वर्षात अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होऊन चक्रीवादळं तयार होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या काही काळात गुजरातवर कमी दाबाचे पट्टे तयार झाले. त्यामुळे कोकण किनारपट्टी असो, वा बंगालचा उपसागर, सगळ्या ठिकाणी जास्त दाब तयार झाला. आणि हवेच्या नियमानुसार, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा वाहते. त्यामुळेच तिकडे बंगाल असो, ओडीशा असो वा इकडे कोकण, गोवा सगळीकडे तुफानी पाऊस झाला. गुलाब चक्रीवादळातही असंच काहीसं घडताना दिसत आहे.

हवामान विभागाकडून पावसाची गणना कशी होते?

भारतीय हवामान विभाग म्हणजेच इंग्रजीत Indian Metrological Department (IMD) चे देशात 36 उपविभाग आहे. यातील अनेक राज्य अशी आहेत, ज्यात एखाच राज्यात 2 विभाग आहेत. महाराष्ट्रात तर हवामान विभागाचे 4 उपविभाग आहेत. याच उपविभागांच्या आधारे पावसाची गणना केली जाते.

हेही वाचा:

23000 वर्षांपूर्वी उत्तरी अमेरिकेत माणसं राहायची, आशिया ते अमेरिका स्थलांतर, पायांच्या ठशांनी इतिहास जिवंत केला!

इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन कसं सुरु करायचं? त्यासाठी खर्च किती? काय आहे Charging Station सुरु करण्याचे नियम? वाचा सविस्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI