Leap Year : दर चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात का येते 29 तारीख? ‘लीप इयर’ म्हणजे नेमकं काय?

येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 46 वर्षांपूर्वी, रोमन सम्राट ज्युलियस सीझरने नवीन गणनांवर आधारित नवीन कॅलेंडर तयार केले. या कॅलेंडरमध्ये 12 महिने होते. ज्युलियस सीझरची हत्या इ.स.पूर्व 44 मध्ये झाली. त्यांच्या सन्मानार्थ कॅलेंडरच्या सातव्या महिन्याचे नाव जुलै ठेवण्यात आले. जुलै महिन्यात 31 दिवस असायचे.

Leap Year : दर चार वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यात का येते 29 तारीख? 'लीप इयर' म्हणजे नेमकं काय?
लीप इयर म्हणजे काय?Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 10:22 AM

मुंबई : दर चार वर्षांनी 29 फेब्रुवारी ही तारीख का येते याचा कधी विचार केला आहे का? ही चूक आहे की यामागे काही विज्ञान किंवा काही तर्क आहे? यामागे एखादी चुक किंवा गल्लत मुळीच नाही तर यामागचे नेमके कारण म्हणजे 29 ही तारीख दर 4 वर्षांनी फेब्रुवारीमध्ये येते जेणेकरून आपले कॅलेंडर वर्ष सौर वर्षाशी जुळते. आपल्या सूर्यमालेतील महत्त्वाच्या गोष्टीमुळे दर चार वर्षांनी लीप इयर (Story Of leap Year) आवश्यक आहे. सामान्यतः असे मानले जाते की पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात, पण पूर्ण सत्य नाही. पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षीणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. चार वर्षांचे सहा तास एकत्र केल्यास ते 24 तास म्हणजेच एक दिवस होतो. हा वेळ समायोजित करण्यासाठी लीप इयर आवश्यक आहे. काही शतकांपूर्वी फेब्रुवारी महिनाही 30 दिवसांचा असायचा, पण रोमन सम्राट सीझर ऑगस्टसच्या अहंकारामुळे तो 28 दिवसांचा झाला.

गोष्ट फेब्रुवारी महिन्याची

फेब्रुवारी महिना सर्वात लहान महिना का ठरला हे जाणून घेण्यासाठी इतिहासात जावे लागेल. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 46 वर्षांपूर्वी, रोमन सम्राट ज्युलियस सीझरने नवीन गणनांवर आधारित नवीन कॅलेंडर तयार केले. या कॅलेंडरमध्ये 12 महिने होते. ज्युलियस सीझरची हत्या इ.स.पूर्व 44 मध्ये झाली. त्यांच्या सन्मानार्थ कॅलेंडरच्या सातव्या महिन्याचे नाव जुलै ठेवण्यात आले. जुलै महिन्यात 31 दिवस असायचे. ज्युलियस सीझर नंतर सीझर ऑगस्टस सम्राट झाला. आठवा महिना ऑगस्ट हे त्यांच्या नावावर ठेवण्यात आले.

आता ज्युलियस सीझरच्या नावावर असलेला जुलै महिना 31 दिवसांचा होता, पण त्याच्या नावावर ठेवलेला ऑगस्ट महिना फक्त 29 दिवसांचा होता हे पाहून ऑगस्टस चिडला. त्याचा अहंकार दुखावला. ऑगस्टसने ऑगस्टला जुलैच्या बरोबरीचे करण्याचा निर्णय घेतला. आणि कॅलेंडर बदलले. अशा प्रकारे ऑगस्ट महिन्यात 31 दिवस करण्यात आले आणि फेब्रुवारीमध्ये 28 दिवस झाले.

हे सुद्धा वाचा

म्हणून दर 4 वर्षांनी 1 दिवस वाढतो

रोमन साम्राज्यात कॅलेंडर प्रचलित होते. ज्युलियस सीझर सम्राट होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या कॅलेंडरमध्ये 355 दिवस होते. त्यानंतर, कॅलेंडर वर्ष सौर वर्षाशी जुळण्यासाठी दर दोन वर्षांनी 22 दिवस जोडले गेले.

मात्र यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. मग ज्युलियस सीझरने गणिते नव्याने केली. पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला 365 दिवस आणि 6 तास लागतात हे समोर आले. त्यामुळे कॅलेंडर 365 दिवसांचे करण्यात आले.

यासोबतच ज्युलियस सीझरने खगोलशास्त्रज्ञ सोसिजेनेस यांना हा अतिरिक्त तास सोडवण्यास सांगितले. दर चार वर्षांनी एक दिवस वाढवण्याची सूचना त्यांनी केली. आणि अशा प्रकारे दर चार वर्षांनी 366 दिवसांचे कॅलेंडर वर्ष तयार झाले.

‘लीप डे’ नसेल तर काय होईल?

दर चार वर्षांनी लीप डे जोडला नाही तर अनेक समस्या उद्भवू शकतात. लीप दिवस महत्वाचा आहे कारण तो कॅलेंडर वर्ष आणि सौर वर्षाशी जुळतो.

कॅलेंडर वर्षानुसार, एक वर्ष 365 दिवसांत पूर्ण होते, तर सौर वर्षानुसार, एक वर्ष 365 दिवस आणि अंदाजे 6 तासांत पूर्ण होते.

नासाच्या म्हणण्यानुसार, एका वर्षातील 6 तासांचा वेळ फारसा फरक पडत नाही, परंतु वर्षानुवर्षे त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे हवामान प्रणालीही बदलू शकते. उदाहरणार्थ, काही ठिकाणी मे हा उन्हाळ्याचा महिना असतो. लीप वर्ष नसेल तर काहीशे वर्षात मे हिवाळ्याचा महिना होईल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.