सापाने डंख मारला तरी मुंगूस मरत का नाही? सापाच्या विषाचा मुंगूसावर परिणाम का होत नाही? कारण जाणून धक्का बसेल
साप आणि मुंगूस हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत. पण कधी विचार केला का, की सापाच्या विषाचा मुंगूसावर काहीच परिणाम का होत नाही? सापाने जरी मुंगूसाला डंख मारला तरी देखील मुंगूसावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मुंगूस मरत नाही. याच कारण जाणून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.

साप म्हटलं की भल्या भल्यांना घाम फुटतो. साप दिसला तरी माणूस कोसो दूर पळतो. कारण त्याचे विष जीवघेणे असते. माणूस वाचला तर त्याचं नशीब बलवत्तर अन्यथा सापाच्या एका चाव्यामुळे देखील माणसाचा मृत्यू होऊ शकतो. कारण साप हा जगातील सर्वात विषारी प्राणी मानला जातो. पण हे तुम्हाला माहित आहे का की सापाने डंख मारला तरी मुंगूस मरत नाही. पण कधी विचार केला का की साप कितीही विषारी असूदेत सापाच्या विषाचा मुंगूसावर कधीच परिणाम का होत नाही? कारण जाणून नक्कीच तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सापाच्या विषाचा मुंगूसावर काही परिणाम का होत नाही?
साप आणि मुंगूस एकमेकांचे शत्रू असतात हे सर्वांना माहित आहे. पण साप स्वतः मुंगूसांना घाबरतात. कारण मुंगूस सापांना खूप चांगल्या प्रकारे पकडतात आणि मारतात. खरं तर, मुंगूसाच्या शरीरात एसिटाइलकोलीन असते. ते एक न्यूरोट्रांसमीटर आहे, जे त्यांच्या मेंदूत असते. ते रक्तात मिसळलेल्या विषाचा न्यूरोटॉक्सिक प्रभाव कमी करते. यामुळे, मुंगूस सापाच्या विषाने मरत नाहीत. तथापि, कधीकधी मोठे साप देखील मुंगूसांवर भारी पडू शकतात.
साप आणि मुंगूस यांच्यात शत्रुत्व का आहे?
साप आणि मुंगूस हे एकमेकांचे कट्टर शत्रू असतात हे आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण कधी विचार केला का, की यामागे नक्की काय कारण असू शकते. फॉरेस्ट वाइल्डलाइफ वेबसाइटच्या अहवालानुसार, मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व नैसर्गिक आहे. माहितीनुसार, साप हे मुंगूसांचे फक्त अन्न आहे. ते फक्त अन्नासाठी सापांची शिकार करतात. पण मनोरंजक गोष्ट अशी आहे की मुंगूस सहसा प्रथम हल्ला करत नाहीत, ते फक्त स्वतःला किंवा त्याच्या पिल्लांना सापाच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी हल्ला करतात.
म्हणून मुंगूस सापावर भारी पडतात
इंडियन ग्रे मॉन्गूस म्हणजेच मुंगूस हा सर्वात धोकादायक साप मारणारा प्राणी मानला जातो. म्हणजेच सापांचा शत्रू मानला जातो. तो किंग कोब्रालाही मारण्यास सक्षम असतो असं म्हटलं जातं. जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. यापैकी काही इतके विषारी आहेत की त्यांच्या विषाचे काही थेंबामुळे कोणत्याही प्राण्याचा किंवा माणसाचा मृत्यू होऊ शकतो. परंतु एसिटाइलकोलिनमुळे सापाचे विष मुंगूसावर परिणाम करत नाही. त्यामुळे मुंगूस आणि सापाच्या भांडणात जेव्हा साप हल्ला करण्यासाठी किंवा स्वत:चा बचाव करण्यासाठी मुंगूसाला डंख मारतात तेव्हा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.
