अंबानींच्या घरात एकाच दिवशी बनतात तब्बल इतक्या भाज्या, महिनाभराचे सोडा, एकाच दिवसात..

अंबानी कुटुंब फक्त देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अफाट पैसा असला तरीही जमिनीसोबत सोडलेले आहे. अंबानींच्या घरात 600 कर्मचारी दररोज काम करतात.

अंबानींच्या घरात एकाच दिवशी बनतात तब्बल इतक्या भाज्या, महिनाभराचे सोडा, एकाच दिवसात..
Ambani family
| Updated on: Aug 05, 2026 | 4:00 PM

अंबानी कुटुंब कायमच चर्चेत असते. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आपल्या घरात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला घरातील सदस्यच समजतात. घरातील सदस्यांसारखी त्यांना वागणूक दिली जाते. शिवाय त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष दिले जाते. कर्मचाऱ्यांना अत्यंत पाैष्टिक जेवण दिले जाते. अंबानी कुटुंबिय शाकाहारी आणि साधे अन्न खाणे पसंत करतात. त्यांच्यासाठी जे जेवण बनवले जाते, तेच जेवण घरातील 600 कर्मचाऱ्यांना दिले जाते. 24 तास अंबानींच्या घरात 600 कर्मचारी काम करतात. त्यांच्या खाण्याकडे विशेष लक्ष दिले जाते. अंबानी कुटुंबियांना हॉटेलचे आणि खूप जास्त तेलकट तुपकट जेवण अजिबात आवडत नाही. सात्विक जेवणावर त्यांचा भर आहे. पदार्थांची शुद्धता अत्यंत महत्वाची आहे. अंबानी कुटुंबियांसाठी दररोज तब्बल 32 भाज्या तयार केल्या जातात.

विशेष म्हणजे दररोज वेगवेगळ्या भाज्या असतात. दुपारच्या जेवणात 32 अत्यंत पाैष्टिक अशा भाज्या दररोजच्या जेवणात असतात. विशेष म्हणजे जास्तीत जास्त आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या भाज्यांचा यात समावेश असतो. कधी कोणती भाजी बनवायची, हे अगोदरच ठरले असते. सीजननुसारही भाज्या तयार केल्या जातात. 32 भाज्यांशिवाय अंबानींचे दुपारचे जेवण तयार होत नाही.

यासोबतच डाळ, भात चपाती सलाड हे देखील जेवणात असते. रात्रीच्या जेवणात अंबानी कुटुंबिय साधे आणि पचायला सोपे अन्न खातात. त्यांच्या रात्रीच्या जेवणात नाचणीची भाकरी असते. कधी कधी बाजरीचीही भाकरी ते रात्रीच्या जेवणात घेतात. गुजराती स्टाईलच्या भाज्या त्यांच्या जेवणात असतात. रान भाज्यांचाही त्यांच्या जेवणात समावेश असतो. फक्त अंबानी कुटुंबियांनाच नाही तर कर्मचाऱ्यांना देखील गरमागरम जेवण दिले जाते.

अंबानी कुटुंबियांच्या घरी दररोज 4 हजार चपात्या केल्या जातात. मात्र, मशिनच्या मदतीने या चपात्या केल्या जातात. रोटी मेकर मशिन बसवण्यात आले. तिथेच चपात्या तयार होतात. ज्यामुळे चपात्या बनवायचा वेळ आरामात वाचतो. विशेष म्हणजे किचनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा पगार हा दिला जातो. भाज्या साफ करण्यासाठीही वेगळे कर्मचारी अंबानींकडे आहेत. सर्वांना जबाबदारी वाटून देण्यात आल्यात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us