ओमिक्रॉन XE ने वाढवली भीती… खरच किती घातक आहे हा नवा व्हेरिएंट?

| Updated on: Apr 07, 2022 | 1:33 PM

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा एक नवीन व्हेरिएंट सध्या खूप चर्चेत आहे. बुधवारी आलेल्या अनेक बातम्यांनुसार ओमिक्रॉन XE या नवीन कोरोना व्हेरिएंटने मुंबईच्या माध्यमातून भारतात आपली एंट्री केल्याचे बोलले जात आहे. परंतु आरोग्य मंत्रालयाकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. बुधवारी आलेल्या एका बातमीनुसार, मुंबईमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन XE या नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले आहे.

ओमिक्रॉन XE ने वाढवली भीती... खरच किती घातक आहे हा नवा व्हेरिएंट?
ओमायक्रॉन
Image Credit source: mint
Follow us on

मुंबई :  गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाच्या (Corona) रुग्णांची संख्या वेगाने खाली येत आहे. अनेक शहरे तर कोरोनामुक्त झाली आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये कोरोना निर्बंधांना मागे घेउन जनजीवन पुन्हा सुरळीत सुरु झाले आहे. यातच आता पुन्हा कोरोनाच्या एका नव्या व्हेरिएंटमुळे (Variant) काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी आलेल्या एका बातमीनुसार, मुंबईमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन XE (Omicron XE) या नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही बातमी फेटाळून लावली आहे. मंत्रालयाने हे स्पष्ट केलेय, की सध्याची लक्षणे व चाचण्यांवरुन हा नवीन व्हेरिएंट आहे हे स्पष्ट होत नसल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटच्या भारतातील अस्तित्वाबाबत अद्याप चित्र स्पष्ट नसले तरी, हा नवीन व्हेरिएंट किती घातक ठरु शकतो, याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. ओमिक्रॉन XE मुळे गंभीर संसर्ग होण्याची शक्यता आहे का? हा अधिक वेगाने पसरतो का? हा व्हेरिएंट भारतात आल्यावर किती वेगाने पसरु शकतो. यातून संसर्ग झाल्यास मृत्यूदर किती असेल? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

मुंबईत काय झाले?

बुधवारी एक बातमी आली. त्यानुसार असे सांगण्यात आले, की मुंबईमध्ये एका महिलेला ओमिक्रॉन XE या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लागण झाली आहे. संबंधित महिला अफ्रिकेतून भारतात परतली असल्याने तिला परदेश प्रवासाची हिस्ट्री होती. दरम्यान, महिलेला कोरोनाची कुठलीही लक्षणे नव्हती. परंतु तरीही तिला कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लागण झाल्याची बातमी पसरल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची दखल घेत ही अफवा असल्याचे जाहीर केले.

काय आहे ओमिक्रॉन XE व्हेरिएंट?

ओमिक्रॉन XE हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या जुन्या दोन प्रकार असलेल्या बीए 1 व बीए 2 चा नवीन उत्परिवर्तीत प्रकार आहे. ‘फस्टपोस्ट’च्या रिपोर्टनुसार, हा नवीन व्हेरिएंट सर्वात पहिल्यांदा 19 जानेवारी रोजी युकेमध्ये आढळला होता. आता पर्यंत या व्हेरिएंटची 600 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. आधीच्या सर्व प्रकारांपेक्षा हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत असल्याचे म्हटले जात आहे. ब्रिटीश मेडिकल जर्नलनुसार, जर एखाद्या व्यक्तीला एकापेक्षा अधिक व्हेरिएंटची लागण झाल्यास त्याच्या शरीरात अनुवांशिक पध्दतीने व्हेरिएंटमध्ये बदल होउन एक नवीन व्हेरिएंटची निर्मिती होत असते. अशा पध्दतीने आतापर्यंत तीन नवीन व्हेरिएंट समोर आले असून त्याच एक्सडी, एक्सई व एक्सएफचा समावेश आहे. एक्सएफ हा डेल्टा आणि बीए 1 या दोघांच्या मिश्रणातून तयार झालेला नवीन व्हेरिएंट आहे.

किती घातक आहे XE व्हेरिएंट?

XE व्हेरिएंट हा सर्वाधिग वेगाने पसरणारा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे सध्या दितस आहे. परंतु अद्यापही डब्ल्यूएचओ कोरोनाच्या विविध व्हेरिएंटवर रिसर्च करीत असल्याने याबाबत पुरेशी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. त्यानंतर हा नवीन कोरोनाचा प्रकार किती घातक आहे हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, नवीन कोरोनाचा व्हेरिएंट वेगाने पसरत असल्याचीच माहिती समोर आली आहे. हा नवीन प्रकार किती घातक आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नसल्याने लोकांनी याला जास्त घाबरु नये असे सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या :

15 दिवसांत 13 वेळा वाढ, प्रत्येकवेळी 80 पैशांची भर टाकण्यामागचं नेमकं कारण काय? उत्तर मिळालंय!

Sri Lanka Crisis : जे श्रीलंकेत झालं ते भारतातही होणार? सोन्याच्या लंकेचं वाटोळं कसं झालं? 5 मुद्यातून समजून घ्या

Sri Lanka Crisis: घराणेशाहीच्या वाळवीनं अख्ख्या देशाला पोखरलं! राजपक्षे कुटुंबांची का होतेय चर्चा?