AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sri Lanka Crisis: घराणेशाहीच्या वाळवीनं अख्ख्या देशाला पोखरलं! राजपक्षे कुटुंबांची का होतेय चर्चा?

Sri Lanka Rajapaksa family : श्रीलंकेत एकूण 26 मंत्री होते. या सगळ्यांच्या राजीनाम्यासोबत सर्वाधिक चर्चा होते, ती एकाच कुटुंबातील पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची! राजपक्षे कुटुंबातील 5 जणं मंत्रिमंडळात होते.

Sri Lanka Crisis: घराणेशाहीच्या वाळवीनं अख्ख्या देशाला पोखरलं! राजपक्षे कुटुंबांची का होतेय चर्चा?
राजपक्षेंच्या घराणेशाहीनं श्रीलंका देशोधडीलाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 04, 2022 | 4:46 PM
Share

श्रीलंका मेटाकुटीला (Sri Lanka Economic crisis) आली आहे. सगळी अर्थव्यवस्था कोलमडल्यानं सगळेच बेजार झालेत. त्यामुळे श्रीलंका देशावर ज्यांनी अनेक वर्ष सत्ता गाजवली, ते ही यानिमित्तानं चर्चेत आलेत. श्रीलंकेतील हलाखीच्या परिस्थितीला जर कुणी जबाबदार असेल, तर श्रीलंकेतील सत्ताधारीच आहेत, असा तर्क काढला गेला, तर वावगं ठरु नये! गरजेच्या वस्तूंचे वाढलेले दामदुप्पट भाव, आणीबाणी, जगायचं कसं?, याबाबतचा मोठा प्रश्न आता श्रीलंकेतील सर्वसामान्य जनतेसमोर उभा ठाकलेलाय. या सगळ्या परिस्थितीत एक असं कुटुंब आहे, ज्यानं श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व केलं. श्रीलंकेतील (Sri Lanka) सगळ्यात ताकदवर कुटुंब म्हणून या घराण्याकडे पाहिलं जातं. या कुटुंबाचं नाव आहे राजपक्षे (Rajapaksa Family)!

राजपक्षेंच्या घराणेशाहीमुळे श्रीलंका देशोधडीला लागली असल्याचाही आरोप काही जाणकारांनी केलेला आहे. राजपक्षे घराण्यानं श्रीलंकेची सत्ता नेहमीच आपल्या हातात ठेवली. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळातही राजपक्षे घराण्यातील तब्बल पाच जण महत्त्वाचे मंत्री होते. म्हणून राजपक्षे घराणं काय आहे, त्यांनी श्रीलंकेत नेमकं काय काय केलं, याचीही चर्चा आता रंगू लागली आहे. चला तर याबाबत जाणून घेऊयात…

श्रीलंकेत महागाईनं हाल!

…घराणेशाही विरोधात रोष

श्रीलंकेतील लोकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय. वाढलेल्या महागाईचा हा भडका श्रीलंकेच्या राष्ट्रपतींच्या घराबाहेरही उडाला होता. श्रीलंकेची भडकलेली जनता राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेल्या सैन्याशीही भिडली होती. यामुळे एकच गोंधळही उडाला होता. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आणीबाणीची घोषणाही करण्यात आली.

आणीबाणीच्या घोषणेनंतरही श्रीलंकेतली जनतेचा संताप काही कमी झाला नाही. अखेर श्रीलंकेतील सर्व मंत्र्यांनी रविवारी राजीनामा दिला. श्रीलंकेत एकूण 26 मंत्री होते. या सगळ्यांच्या राजीनाम्यासोबत सर्वाधिक चर्चा होते, ती एकाच कुटुंबातील पाच मंत्र्यांच्या राजीनाम्याची! राजपक्षे कुटुंबातील पाच जणं मंत्रिमंडळात होते.

कोण आहेत राजपक्षे कुटुंबातील 5 मंत्री?

  1. गोटबाया राजपक्षे, राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री
  2. महिंदा राजपक्षे, पंतप्रधान
  3. चमल राजपक्षे, सिंचन मंत्री
  4. बासिल राजपक्षे, अर्थमंत्री
  5. नमल राजपक्षे, क्रीडा मंत्री

या पाच पैकी क्रीडा मंत्री असलेल्या नमल राजपक्षे हे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे सुपुत्र आहेत. हे तर झाले फक्त कॅबिनेटमंत्री! राजपक्षे कुटुंबाता श्रीलंकेच्या राजकारणातील दबदबा इथंच संपत नाही. कारण याव्यतिरीक्त राजपक्षे कुटुंबातील इतरही इनेकांनी मंत्रिमंडळातील कनिष्ट मंत्रिपदंही देण्यात आलेली होती.

महिंदा राजपक्षेंचा इतिहास

महिंदा राजपक्षे यांनी दहा वर्ष श्रीलंकेचं राष्ट्रपती पद भूषवलं होतं. 2009 साली तमिळ विद्रोहींच्या विरोधात 25 वर्षांच्या गृहयुद्धाला पूर्णविराम लावल्यानं प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यांच्या येण्यानं श्रीलंका आणि चीनचे संबंध सुधारले होते आणि या संबंधात वृद्धीही झाली होती.

गोयबाया राजपक्षेंचा इतिहास

गोटबाया राजपक्षे ही 72 वर्षांचे आहेत. त्यांना मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. गोटबाया यांना राजपक्षे कुटुंबानं द टर्मिनेटर म्हणून ओळखलं जातं. ईस्टरच्या दिवशी झालेल्या हल्लापासून फक्त तेच देशाची सुरक्षित ठेवू शकतात, अशी प्रतिमा त्यांनी सगळ्यासमोर निर्माण तेली होती. गोटबाया यांना प्रचंड रागही येतो. त्यामुळे लोकांमध्ये त्यांचा प्रचंड धाकही असल्याचं सांगितलं जातं.

अजून कोण कोण आहे?

चमल राजपक्षे यांच्या सिंचन मंत्रालय देण्यात आलं होतं. त्याचं वय आहे 79 वर्ष! याआधी त्यांनी शिपिंग आणि विमान मंत्रालयही सांभाळलेलंय. दरम्यान, बासिल राजपक्षे हे अर्थमंत्री होते. मिस्टर टेन पर्सेट असं त्यांनी बीबीसीतील एका मुलाखतीत म्हटलं गेलं होतं. अनेक सरकारी कंत्राटांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. पण गोटबाया राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्यावरील सगळे आरोप हटवण्यात आले होते. दरम्यान, नमल राजपक्षे हे क्रीडा मंत्री असून ते पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे सुपुक्षही आहे. अवघ्या 24 व्या वर्षी त्यांना मंत्री बनवण्यात आलं हतं. 2010 साली पहिल्यांदा श्रीलंकेच्या संसदेत प्रवेश केला होता. कायद्याचं शिक्षण केलेल्या नमल यांना क्रीडा खातं देण्यात आलं होतं.

इतर आंतरराष्ट्रीय बातम्या :

Prison riots : इक्वाडोरच्या जेलमध्ये ‘रक्तांचल’… 20 कैद्यांचा मृत्यू, काय आहे नेमकं प्रकरणं..?

पाकिस्तानात संवैधानिक पेच, इम्रान काळजीवाहू पंतप्रधान, जाणून घ्या पाकिस्तानात नेमकं काय घडतंय

Sri Lanka: एक अंड 30 रुपये, 1 किलो बटाटी 200 रुपये! जगायचं तरी कसं? श्रीलंकेतील जनतेसमोर प्रश्नच प्रश्न

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.