AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EMI भरला नाही तर मोबाईल होणार नाही लॉक, RBI चा नियमात मोठा बदल, थेट ग्राहकांना..

ईएमआयवर मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र, बऱ्याचदा जर हप्ते वेळेवर भरली नाही तर बँकाकडून किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांकडून संबंध डिव्हाइस बंद केले जाते. मात्र, आता RBI ने यात मोठे बदल केली आहेत.

EMI भरला नाही तर मोबाईल होणार नाही लॉक, RBI चा नियमात मोठा बदल, थेट ग्राहकांना..
EMI Mobile Lock
| Updated on: Aug 07, 2026 | 4:00 PM
Share

आपल्याकडे अनेक लोक वस्तू ईएमआयवर घेतात. घरात लागणाऱ्या वस्तूही ईएमआयवर घेतल्या जातात. त्यातच मोबाईल, लॅपटॉपही ईएमआयवर घेतली जातात. मात्र, ईएमआय थकल्यानंतर बँक किंवा वित्तीय संख्य संबंधित डिव्हाइस रीमोटने लॉक करतात. ज्यामुळे जर EMI थकले तर ग्राहक अधिक अडचणीत सापडतो. आता कंपन्यांची किंवा बँकची अशी दादागिरी अजिबात चालणार नाही. यावर कडक पाऊले RBI कडून उचलण्यात आलीत. हा नवीन नियम 1 जानेवारी 2027 ला लागू केला जाईल. ईएमआय थकल्यानंतरही मोबाईल किंवा संबंध डिव्हाइस कंपनीला लॉक अजिबात करता येणार नाही. तुम्ही पर्सनल लोन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने ईएमआयवर वस्तू खरेदी केली असेल तर ती आता लगेचच लॉक होणार नाही. RBI च्या नवीन नियमानुसार, तुमचे डिव्हाइस बंद होऊ शकणार नाही. कर्जाचा हप्ता 30 दिवसांपेक्षा जास्त थकला तर निर्बंध लावले जाऊ शकत नाहीत.

60 दिवसांपेक्षा अधिक काळ तर हप्ता थकला तर डिव्हाइस लॉक करण्याची परवानगी आहे. ज्यामुळे ग्राहकांना हप्ते भरण्यासाठी अधिकचा वेळ मिळण्यास मदत होईल. यासोबतच RBI ने स्पष्ट केले की, डिव्हाइस सेवा पूर्णपणे बंद करता येणार नाही. इनकमिंग काल, एसएमएस सेवा सुरू राहिल ग्राहकांना दैनंदिन व्यवहार करता यावीत, आपत्कालीन नंबरही पूर्णपणे बंद होणार नाही.

यासोबतच ग्राहकाच्या पर्सनल डेटाबद्दलची RBI ने कडक निर्बंध घातली आहेत. बँका किंवा वित्तीय संस्था ग्राहकांच्या संपर्क यादी, फोटो, व्हिडीओ, एसएमएस, कॉल माहिती, लोकेशन डेटा किंवा इतर माहिती पाहू शकणार नाहीत. डिव्हाइस लॉक करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान डेटा संरक्षणाच्या नियमात असणे आवश्यक आहे.

RBI ने स्पष्ट केले की, नवीन नियम लागू झाल्यानंतर ग्राहकांना कर्ज वेळेपूर्वी पूर्णपणे फेडण्याचा अधिकार कायम असणार आहे. मात्र, डिव्हाइस लॉक करण्याच्या प्रक्रियेमुळे या अधिकारावर कोणताही परिणाम होणार नाही. कर्ज देणाऱ्या संस्था किंवा बँका RBI ने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक निर्बंध ग्राहकांना डिव्हाइस लागू करू शकणार नाहीत.

Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?