AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात ही झाडं ठरतात सापांचा अड्डा, तुमच्या आसापास असतील तर जरा जपूनच

सापाच्या विश्वाबाबत कायम कुतुहल असतं. अनेकांना सापाची भीती वाटते. तसेच काही जण सापाच्या विश्वात रमतात. उन्हाळ्यात सापांचा वावर वाढतो. उष्णतेमुळे साप थंडाव्याचा आसरा घेताता. अशा स्थितीत काही झाडं ही सापांचा अड्डा ठरतात. चला जाणून घेऊयात याबाबत

उन्हाळ्यात ही झाडं ठरतात सापांचा अड्डा, तुमच्या आसापास असतील तर जरा जपूनच
उष्णतेपासून संरक्षणासाठी साप घेतात या झाडांचा आसरा, तुमच्या घराजवळ तर नाहीत नाImage Credit source: फाईल फोटो
| Updated on: May 06, 2025 | 7:02 PM
Share

आपल्यासमोर साप फणा काढून उभा राहिला तर आपली बोबडी वळेल. इतकंच काय तर कित्येक दिवस त्या वाटेनं जाणं देखील आपण टाळू. कारण सापाच्या दंशाने काय होऊ शकतं याची जाणीव प्रत्येकाला आहे. काही साप विषारी नसतात पण त्यांना पाहूनही आपला थरकाप उडतो. सर्पमित्रांना सापाचं तसं काही वाटत नाही. पण ज्यांना सापाची भीती वाटते ते अशा ठिकाणी जाणं टाळतात. अनेकांना घराशेजारी झाडं किंवा बाग करण्याची आवड असते. कारण झाडांमुळे वातावरण चांगलं राहतं तसेच थंडावाही राहतो. पण बागेतील काही झाडं तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे अशी झाडं बागेत असतील तर काळजी घेणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात साप त्यांच्या शीतनिद्रेतून जागे होतात आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अशा स्थितीत त्यांना काही झाडं आणि वनस्पती आकर्षित करतात. आज आपण अशाच झाडांबाबत जाणून घेणार आहोत.

उंच गवत आणि झुडपं सापांना आकर्षित करतात. कारण साप आरामात या गवतात लपू शकतात. तसेच अन्नासाठी आवश्यक कीटक आणि इतर भक्ष्यही या ठिकाणी सहज मिळतं. काटेरी झुडुपांमध्ये जास्त प्रमाणात साप आढळतात. कारण या ठिकाणी किटकांचा वावर जास्त असतो. त्यामुळे अन्नासाठी फार काही भटकंती करावी लागत नाही. तसेच सापांना या ठिकाणी सुरक्षित वाटतं. इतकंच काय तर झुडुपांमध्ये सापांना थंडावा मिळतो. त्यात साप आरामात राहू शकतात. त्यामुळे झाडाझुडपं आणि वाढलेल्या गवतांमध्ये काम करताना काळजी घेणं गरजेचं आहे.

फुलांची झाडं देखील किटकांना आकर्षित करतात. त्यामुळे या ठिकाणी बेडकं आपलं भक्ष्य शोधण्यासाठी येतात. बेडूक हा तर सापाचं आवडतं खाद्य.. मग अशी ठिकाणं सापाला आकर्षित करतात. अनेकदा बाग करताना त्या ठिकाणी दगडं रचली जातात. अशी ठिकाणं सापांना आकर्षित करताना सापांना ही जागा उबदार ठरते. तसेच लपण्यासाठी सहज खाचे मिळतात. त्यामुळे साप अशा ठिकाणी वावर करतात.

दुसरीकडे, साप काही वनस्पतींपासून दूर राहणं पसंत करतात. धनंतर नावाचं वनस्पती सापांना दूर करते. झाडाच्या पानाच्या तीव्र गंध सापांना आवडत नाही. सर्पगंधा, वर्मवूड, झेंडुच्या फुलांचे रोप, निवडुंग, स्नेक प्लांटमुळेही साप पळून जातात.

Follow Us
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?