सापाला पाहताच मुंगूस चवताळला, शेवटी काय झालं? दोघांच्या लढाईचा व्हिडीओ एकदा पाहाच
साप आणि मुंगूस यांच्यातील शत्रूत्व सर्वश्रूत आहे. मुंगूस आणि साप एकमेकांसमोर आले तर एकमेकांच्या जीवावर उठतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुंगूस सापाला पाहताच मारायला धाव घेतो आणि सुरु होतो थरार..

साप आणि मुंगूस यांच्यातील वैर अनेक पिढ्यांपासून सुरु आहे. दोघंही एकमेकांना पाहिल्यावर आक्रमक होतात. एक जीव वाचवण्यासाठी, तर एक जीव घेण्यासाठी लढत असतो. तसं पाहीलं तर साप हा विषारी असतो. त्याच्या दंशानंतर योग्यवेळी उपचार मिळाले नाही तर मनुष्याचा मृत्यू होऊ शकतो. पण मुंगूसासमोर त्याचं काही एक चालत नाही. मुंगूस त्याच्या दंशाची पर्वा न करता आक्रमकपणे लढा देत असतो. जीवघेणी लढाई पाहून अनेकदा भीती वाटते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सापाला पाहताच मुंगूस त्याच्यावर आक्रमण करतो. यानंतर काय होतं हे शब्दात लिहताना आणि प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव काही वेगळाच आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तु्म्ही पाहू शकता की साप सरपटत रस्ता ओलांडत असल्याचं दिसत आहे. तितक्यात मुंगूस त्याला पाहतो आणि धाव घेतो. मुंगूस जवळ आल्याचं पाहताच साप बचावासाठी आक्रमक होतो. खरं त्याला काय भीती वाटत असेल हे शब्दात मांडणं कठीण आहे. आधीच पराभव स्वीकारून साप इथून तिथे पळण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर दोघांमध्ये पकडापकडीचा खेळ रंगतो. मुंगूस आपली पूर्ण क्षमता वापरून सापाला एक दोनदा आपल्या तावडीत घेतो. पण त्यानंतर कसं तरी करून सोडवतो आणि पळ काढतो.
View this post on Instagram
मुंगूस इतक्यावर थांबत नाही विषारी सापाचा पाठलाग करणं काही सोडत नाही. काहीच रस्ता सापडत नसल्याचं पाहून साप बिळात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण मुंगूस त्याला तिथेही सोडत नाही. 44 सेकंदानंतर या लढाईचा शेवट होतो. एक क्षण असं वाटतं की साप मरून गेला. पण पुन्हा जेव्हा मुंगूस त्याच्या जवळ जातो तेव्हा तो सरपटण्याऐवजी जीवाच्या आकांताने आपल्या जितकं शक्य होईल तितकी ताकद लावून पळण्याचा प्रयत्न करतो. उंच उडी घेऊन लांब पळण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओच्या शेवटी साप पुढे निघून जातो. त्यानंतर काय होतं हे मात्र कॅमेऱ्यात चित्रित झालेलं नाही.
