सुनीता विलियम्सने केली ISS ची दुरुस्ती, जाणून घ्या शून्य गुरुत्वाकर्षणात कशी काम करतात अवजारे

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स गेल्या सात महिन्यांपासून अंतराळात आहेत. 16 जानेवारीला त्या पहिल्यांदा स्पेस वॉकला गेल्या होत्या. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची दुरुस्ती केली. शून्य गुरुत्वाकर्षणात अवजारे कसे कार्य करतात ते जाणून घेऊ.

सुनीता विलियम्सने केली ISS ची दुरुस्ती, जाणून घ्या शून्य गुरुत्वाकर्षणात कशी काम करतात अवजारे
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 3:30 PM

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स गेल्या सात महिन्यांपासून अंतराळात आहेत. दरम्यान 16 जानेवारीला त्या पहिल्यांदाच इंटरनॅशनल स्पेस सेंटरवर स्पेस वॉक साठी निघाल्या होत्या यावेळी त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर देखील उपस्थित होते. यावेळी दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानाच्या दुरुस्तीचे कामही केले. दोन्ही अंतराळवीर जून 2024 मध्ये आठवडाभराच्या मिशनवर स्पेस स्टेशनवर गेले होते मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे दोघांनाही परतायला वेळ लागत आहे. 16 जानेवारीला सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर स्पेस वॉक साठी गेले होते. दोघेही सुमारे साडेसहा तास स्पेस वॉकवर राहिले आणि त्यांनी मिळून अवकाशयानाची दुरुस्ती केली. अंतराळात गुरुत्वाकर्षण शून्य आहे हे कोणापासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे या दोघांनी अंतराळातील आयएसएस ची दुरुस्ती कशी केली असेल हा प्रश्न नक्कीच सर्वांना पडला आहे.

शून्य गुरुत्वाकर्षणात कशी काम करतात अवजारे?

अंतराळातील जग पृथ्वीपेक्षा वेगळे आहे. अंतराळात शून्य गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे तेथील बहुतांश कामे करणे अवघड जाते त्यांच्यासाठी पर्याय शोधावा लागतो. सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर जवळपास सात महिन्यापासून अंतराळात अडकले आहेत. यादरम्यान 16 जानेवारी रोजी त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची दुरुस्ती करायची होती. दोन्ही अंतराळवीरांनी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता स्पेस वॉक सुरू केला जो साडेसहा तास चालला.

सुनीता विलियम्स आणि तिच्या सहकार्यांनी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या नेव्हिगेशन उपकरणांची दुरुस्ती केली. टेलिस्कोप वरील लाईट फिल्टर पॅच केले आणि इंटरनॅशनल डॉकिंग एडॉप्टर रिफ्लेक्टर बदलले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला अंतराळात दुरुस्त करण्यासाठी कोणत्याही जड अवजाराची गरज नसते. तसेच तेथे कोणत्याही कामासाठी फारसे बळ वापरावे लागत नाही. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन दुरुस्त करणे म्हणजे कोणत्याही साधनाने ते दुरुस्त करणे असे होत नाही. त्यापेक्षा त्यात बसवलेले पार्ट दुरुस्त करावे लागतात.

दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार?

सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेले आहे. ही मोहीम फक्त आठवडाभराची होती मात्र तांत्रिक अडचणीमुळे त्यांना परत येण्यास विलंब झाला आहे. खरंतर बोईंगच्या नवीन स्टार लाइनर कॅप्सूल मध्ये बिघाड झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर थांबावे लागले. असे मानले जात आहे की आता दोघेही मार्च किंवा एप्रिलच्या अखेरीस पृथ्वीवर परत येऊ शकतात.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....