पंखा आणि एसी वापरल्यावर वीजेचा बिल वाढतंय? मग कशी कराल बचत, जाणून घ्या सोपी ट्रिक
उन्हाळा असो की हिवाळा, विजेचा खर्च हा कायमच चिंतेचा विषय असतो. मात्र, काही साध्या आणि स्मार्ट युक्त्या वापरून तुम्ही दरमहा तुमच्या विजबिलात शंभर रुपयांपर्यंत बचत करू शकता. या लेखात अशा काही सोप्या टिप्स जाणून घ्या ज्या तुमचं बजेट हलकं करतील!

भारतात उन्हाळा सुरू झाला आहे आणि विशेषतः उत्तर भारतात सध्या खूप उष्णता आहे. तापत्या सूर्यप्रकाशामुळे आणि वाढत्या तापमानामुळे लोकांना घराबाहेर पडणे खूप कठीण झाले आहे. उष्णतेमुळे लोकांना घरातही राहणे कठीण झाले आहे.पंखा न लावता श्वास घेणे देखील अशक्य झाले आहे. अशा वेळी लोक फक्त पंखाच नाही, तर एसी वापरण्याची गरजही अनुभवत आहेत. मात्र एसीसोबत पंखा वापरल्यास वीजेचे बिल अधिक येते. चला, जाणून घेऊया की पंखा कोणत्या गतीवर चालवल्यास वीजेचा खर्च कमी होतो.
विजबील कमी करण्यासाठी काय कराल ?
बहुतेक वेळा लोक पंखा पूर्ण वेगाने चालवतात, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत. पण पंखा जर कायम फुल स्पीडवर चालवला, तर त्याचा परिणाम वीज बिलावर होतो आणि ते वाढते. याच्या उलट, पंख्याची स्पीड कमी केल्यास वीजेची बचत होते. उदाहरणार्थ, एक सामान्य 70–80 वॉटचा पंखा जर 1 नंबर स्पीडवर चालवला, तर तो अंदाजे 30–35 वॉट वीज वापरतो, आणि 5 नंबर स्पीडवर चालवल्यास सुमारे 70–75 वॉट. त्यामुळे जर तुम्ही पंखा 5 नंबरऐवजी 1 किंवा 2 नंबरवर चालवलात, तर तुमचं वीज बिल नक्कीच कमी येईल.
पंखा खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडेही द्या लक्ष
1. पंखा खरेदी करताना केवळ किंमतीकडे नाही, तर तो कोणत्या कंपनीचा आहे आणि त्याची वीज खपत किती आहे, याकडेही लक्ष द्या. स्थानिक ब्रँडचे पंखे अनेकदा अधिक वीज वापरतात, तर नामांकित आणि विश्वासार्ह कंपन्यांचे पंखे तुलनेत कमी वीज खर्च करतात. त्यामुळे पंखा खरेदी करताना गुणवत्तेचा आणि ऊर्जा कार्यक्षमतेचा विचार नक्की करा.
2. नेहमी पाच स्टार रेटिंग असलेला पंखा घ्या. पाच स्टार रेटिंग असलेली इलेक्ट्रिक उपकरणे तीन स्टार किंवा त्याहून कमी रेटिंग असलेल्या उपकरणांच्या तुलनेत कमी वीज खर्च करतात. याशिवाय, जेव्हा तुम्ही खोलीत नसता तेव्हा पंखा बंद करा. अनेक लोक खोलीत पंखा चालू ठेवून बाहेर जातात, ज्यामुळे वीजेचा बिल अनावश्यकपणे वाढतो.
