VIDEO | ट्रेन जेव्हा 100च्या स्पीडने असते तेव्हा केबिनमध्ये काय घडतं?, ड्रायव्हर कशी करतात गाडी कंट्रोल?, वाचा

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ट्रेन चालवत असताना दोन लोको पायलट सिग्नलबाबत आपापसात कॉर्डिनेशन करीत सिग्नलची माहिती एकमेकांना देत आहेत. (The work of the loco pilot of the train is very responsible, the Railway Minister shared the video of the motorman)

VIDEO | ट्रेन जेव्हा 100च्या स्पीडने असते तेव्हा केबिनमध्ये काय घडतं?, ड्रायव्हर कशी करतात गाडी कंट्रोल?, वाचा
अतिशय जबाबदारीचे असते ट्रेनच्या लोको पायलटचे काम

नवी दिल्ली : रेल्वे हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अनेकांना या रेल्वेबद्दल बरेच प्रश्न पडलेले असतात. रेल्वेच्या मोटरमनचे काम काय असते, स्टीअरिंगशिवाय ट्रेन कशी वळते किंवा वेगात असलेली ट्रेन कशी नियंत्रित केली जाते याबद्दल बरेच प्रश्न पडतात. तसेच, मोटरमनच्या केबिनमध्ये कसे काम चालते. अशा परिस्थितीत, आज आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देतो आणि मोटरमन कशा प्रकारे कार्य करतो हे व्हिडिओद्वारे सांगत आहोत. विशेष म्हणजे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात लोको पायलट एकमेकांना सिग्नल देताना गाड्या चालवताना दिसतात. तसे, हा व्हिडिओ त्या ट्रेनचा आहे ज्याद्वारे ऑक्सिजन पुरविला जात आहे आणि ग्रीन कॉरिडॉरद्वारे ऑक्सिजन वितरीत केला जात आहे. आपणास सांगू की जेव्हा देशात ऑक्सिजन विषयी समस्या उद्भवली होती, तेव्हा रेल्वेने अनेक टन ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पोहचवण्याचे काम केले होते. (The work of the loco pilot of the train is very responsible, the Railway Minister shared the video of the motorman)

कशी चालते ट्रेन?

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता की, ट्रेन चालवत असताना दोन लोको पायलट सिग्नलबाबत आपापसात कॉर्डिनेशन करीत सिग्नलची माहिती एकमेकांना देत आहेत. तसेच एका लिव्हरसह सर्व कंट्रोल करीत हाय स्पीडमध्ये पुढे लक्ष देत ऑक्सिजन पोहचवत आहेत. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता लोको पायलटचे काम फार जबाबदारीचे असते आणि जराही लक्ष विचलीत न करता मॉनिटर करावे लागते.

ट्रेनचा मोटरमन झोपला तर काय होईल?

भारतातील सर्व ट्रेनमध्ये दोन लोको पायलट असतात. एक लोको पायलट झोपला तरी दुसरा लोको पायलट परिस्थिती संभाळण्यास सक्षम असतो. समजा ट्रेनमधील दोन्ही लोको पायलट झोपले, तरीही अपघात होणार नाही. वास्तविक ट्रेन चालवताना लोको पायलट कोणत्याही प्रकारच्या अॅक्टिव्हिटी करत असेल तर ते सब इंजिनला माहित असते. लोको पायलट को इंजिनमध्ये उपस्थित Dead Man’s Lever वेळोवेळी दाबावे लागते. Dead Man’s Lever हे एक खास डिव्हाईस आहे, जो मोटरमन अॅक्टिव्ह असल्याचे इंजिनला संकेत देतो. जर मोटरमनने 2-3 मिनिट हे डिव्हाईस दाबले नाही, तर इंजिन आपोआप ट्रेनचा स्पीड कमी करते.

कशी वळते ट्रेन?

आपण व्हिडिओमध्ये पाहिले आहे की ट्रेनमध्ये स्टीयरिंग नाही, तरीही मोटरमन ट्रेन कशी वळवतात. ट्रेनचे टायर्स ट्रॅकमध्ये सेट असतात. यामुळे जसा ट्रेनचा ट्रॅक असतो त्याच मार्गाने ती ट्रेन पुढे जाते. त्यास स्टीयरिंगची आवश्यकता नसते आणि वळण घेण्यासाठी ट्रॅक अॅडजस्ट केले जातात. ट्रॅकच्या मध्यभागी एक लोखंडी पटरी असते. ही पटरी येणार्‍या ट्रेनला दिशा देण्याचे काम करते. ती किंचित वळलेली असते, म्हणून जर ट्रेन वळवली किंवा दुसर्‍या ट्रॅकवर शिफ्ट करायची असेल तर हा लॉकसारखा ट्रॅक एका बाजूला चिकटवला जातो आणि ट्रॅकची दिशा बदलली जाते. (The work of the loco pilot of the train is very responsible, the Railway Minister shared the video of the motorman)

इतर बातम्या

7th Pay Commission : दहा हजार ग्रेड पे सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2.88 लाखाचं नुकसान

वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI