AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रायल रूममध्ये ड्रेस बदलत होती, अचानक समोर दिसलं असं काही….; क्षणात सुन्न झाली

एका महागड्या दुकानाच्या ट्रायल रूममध्ये एक मुलगी ड्रेस बदलत असताना अचानक तिच्यासोबत जे घडलं ते खरोखरंच सुन्न करणारं होतं. कोणीही  अशा पद्धतीच्या अपघाताची कल्पनाच करू शकणार नाही. 

ट्रायल रूममध्ये ड्रेस बदलत होती, अचानक समोर दिसलं असं काही....; क्षणात सुन्न झाली
zara dress, trial roomImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2025 | 6:03 PM
Share

आपण जेव्हा कोणतेही नवीन कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा मोठ्या दुकानांमध्ये किंवा डिमार्टमध्ये वैगरे घेतलेले कपडे घालून पाहण्यासाठी ट्रायल रूम असतेच असते. आणि ट्रायल रूममध्ये पहिल्यांदा गेल्यावर तर आधी अनेक मुली आधी आरसा किंवा कुठे काही हिडन कॅमेरे नाहीयेत ना याची काळजी घेतो. पण आपल्यावा वाटतं की तेवढाच काय तो धोका आहे.पण असं नाहीये. अपघात हा कुठेही आणि कसाह घडू शकतो. त्यामुळे प्रत्येकवेळी थोडी सावधगिरी बाळगलेलीच चांगली असते. कारण अशीच एक विचित्र घटना एक मुलीसोबतही घडली आहे.

एका महागड्या दुकानाच्या ट्रायल रूममध्ये ड्रेस बदलत असताना…

एक मुलगी एका महागड्या दुकानाच्या ट्रायल रूममध्ये ड्रेस बदलत असताना तिच्या पायावर काहीतरी रेंगाळताना दिसलं आणि जेव्हा तिने ते पाहिलं. तेव्हाते पाहून त्या मुलीला धक्का बसला होता . आणि ती ते पाहताच सुन्न झाली. ब्राझीलच्या ग्वारा शहरातील एका 20 वर्षीय विद्यार्थिसोबत हा प्रकार घडला आहे. अॅलिस स्पायस नावाची विद्यार्थिनी झाराच्या ट्रायल रूममध्ये कपडे ट्राय करत असताना अचानक तिला तिच्या पायावर काहीतरी रेंगाळत असल्याचे जाणवले आणि लगेचच तिला तीव्र वेदना आणि चक्कर येऊ लागली.

कपड्यांना चिकटला होता ….

तपासणीत असे आढळून आले की एक मोठा पिवळा विंचू तिच्या कपड्यांना चिकटला होता. स्टोअरच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब विद्यार्थिनीला व्हीलचेअरवर बसवले आणि तिला प्रथमोपचार दिले. यानंतर, पॅरामेडिक्सची एक टीम घटनास्थळी पोहोचली आणि अॅलिसला आपत्कालीन विभागात नेण्यात आले. तिला रुग्णालयात द्रवपदार्थ (फ्लूइड्स)देण्यात आले आणि दिवसभर तिच्यावर उपचार केले. त्यानंतर धोका टळला आहे याची खात्री करूनच तिला घरी पाठवण्यात आले. परंतु ती अजूनही त्या मुलीला प्रचंड वेदना होत आहेत. ही घटना २० ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घडली.

मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

या घटनेनंतर मॉल पार्क शॉपिंग अॅडमिनिस्ट्रेशनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की त्यांच्या आपत्कालीन पथकाने तातडीने विद्यार्थिनीची तपासणी केली आणि तिला रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. त्यांनी असेही म्हटले आहे की मॉल कठोर कीटक नियंत्रण (पेस्ट कंट्रोल) नियमांचे पालन करतो. झारानेही खेद व्यक्त केला आणि म्हटले आहे की, “आम्हाला या घटनेबद्दल मनापासून वाईट वाटते आणि आम्ही ग्राहकाशी थेट संपर्कात आहोत. तिला आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहोत आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही नक्कीच दखल घेऊ.

आशियाई हॉर्नेटचा वाढता धोका

एका वृत्तानुसार, या घटनेनंतर, ब्रिटनमध्ये कीटकांच्या चाव्यांबाबत इशारा देण्यात आला आहे. अलीकडेच, तज्ञांनी आशियाई हॉर्नेटबद्दल माहिती शेअर केली आहे. जो यूकेमध्ये वेगाने पसरत आहे. हे पिवळे पाय असलेले हॉर्नेट मूळतः 2004 मध्ये चीनमधून फ्रान्समध्ये आले होते आणि आता त्याची अनेक घरटी ब्रिटनमध्ये आढळली आहेत. आशियाई हॉर्नेटचा चावा अत्यंत वेदनादायक मानला जातो, ज्याचे वर्णन जळत्या सुईच्या टोचण्यासारखे असते.

एक हॉर्नेट दिवसाला 50 मधमाश्या खाऊ शकतो आणि त्यांचा कळप हा 30,000 हून अधिक मधमाश्या असलेल्या पोळ्याचा नाश करू शकतो.2024 मध्ये, ब्रिटनमध्ये त्याची उपस्थितीची 71 वेळा पुष्टी झाली आहे आणि त्यांची 24 घरटी आढळली आहेत. तथापि, तेथे त्याची कायमची लोकसंख्या अद्याप तयार झालेली नाही, परंतु DEFRA (पर्यावरण, अन्न आणि ग्रामीण व्यवहार विभाग) याबद्दल निर्मूलन मोहीम राबवत आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.