घर खरेदी करताना वापरा हे सूत्र, कधीच येणार नाही EMI भरायचं टेन्शन

आपलं हक्काचं घऱ असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे घर खरेदी करण्यासाठी तुम्हाला अचूक आर्थिक नियोजन देखील करता आले पाहिजे. कधीकधी कोणतेही आर्थिक संकट आले तर आपल्याला टेन्शन येतं. पण जर तुम्ही खाली दिलेले सूत्र वापरले तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल.

घर खरेदी करताना वापरा हे सूत्र, कधीच येणार नाही EMI भरायचं टेन्शन
New home tips
Follow us
| Updated on: Apr 10, 2024 | 8:05 PM

Home Buying Tips : आज मुंबई, पुण्यासारख्या अनेक शहरांमध्ये घरांच्या किंवा फ्लॅटच्या किमती इतक्या वाढल्या आहेत की सर्वसामान्य लोकांना घर खरेदी करणे अवघड झाले आहे. मध्यमवर्गीय लोकं गृहकर्ज घेऊन घराचं स्वप्न पूर्ण करतात. पण गृहकर्ज घेतल्याने त्यावर व्याजही अधिक भरावे लागते. शिवाय अनेक वर्ष अंगावर कर्ज असल्याने लोकांना चिंता सतावत असते. त्यामुळे घर घेताना कोणतीही अडचण येत नाही, परंतु जेव्हा ईएमआय भरावा लागतो तेव्हा परिस्थिती अधिकच बिकट होते. अनेक वेळा लोक महागडे घर विकत घेतात आणि बँकेकडून कर्जासारखी एवढी मोठी रक्कम घेतात की दर महिन्याला त्याची ईएमआय व्यवस्था करणे कठीण होऊन जाते आणि ईएमआय वेळेवर भरला तरी घराचे उरलेले बजेट विस्कळीत होते.

ईएमआय वेळेवर भरण्यासाठी आपल्याला तडजोड करावी लागते. त्यामुळे अशी परिस्थिती टाळण्यासाठी एक विशेष धोरण स्वीकारले पाहिजे. घर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे आणि बजेट कसं ठरवलं पाहिजे हे आपण जाणून घेणार आहोत. घर घेताना बिल्डरला किती डाउन पेमेंट द्यावे आणि बँकेकडून किती कर्ज घेतले पाहिजे आणि किती कालावधीसाठी असावे हा फॉर्म्युला जाणून घेऊयात.

घर खरेदी करताना हे सूत्र लागू करा

जेव्हा तुम्ही स्वतःसाठी घर खरेदी करता तेव्हा 3/20/30/40 हे विशेष सूत्र वापरायला हवे. जर तुम्ही या सूत्रानुसार आर्थिक नियोजन केले तर तुम्हाला EMI चा बोजा त्रास देणार आहे. यामुळे तुमचे घराचे बजेट देखील बिघडणार नाही.

3 चा अर्थ काय

3 म्हणजे तुम्ही जे घर खरेदी करणार आहात, त्याची किंमत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या तिप्पट नसावी. याचा अर्थ असा की, जर तुमचे वार्षिक पॅकेज 10 लाख रुपये असेल तर तुम्ही 30 लाख रुपयांपर्यंत घर किंवा फ्लॅट खरेदी करू शकता आणि जर तुमचे पॅकेज 15 लाख रुपये असेल तर तुम्ही 45 लाख रुपयांपर्यंतची मालमत्ता खरेदी करू शकता. तिप्पट पेक्षा त्याची रक्कम जास्त नसावी.

20 चा अर्थ

20 म्हणजे कर्जाची मुदत. गृहकर्ज हे 10, 15, 20, 25 किंवा 30 वर्षांसाठी घेता येते. तुम्ही जितके जास्त कालावधीसाठी कर्ज घेता तितका इएमआय तुम्हाला कमी बसतो. पण यामुळे व्याज जास्त भरावे लागते. अशा स्थितीत आपले नुकसान होते. त्यामुळे कर्जाचा कमाल कालावधी फक्त 20 वर्षे असावा. तुम्ही 20 वर्षांच्या कालावधीत तुमचा EMI सहज भरू शकता.

30 चा अर्थ

30 म्हणजे तुमचा EMI. तुम्ही महिन्याला जितके कमवता त्यानुसार तुमचा EMI तुम्ही कमावलेल्या पगाराच्या 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. समजा तुम्हाला दरमहा 75 हजार रुपये पगार मिळत असेल तर तुमचा ईएमआय 22,500 रुपयांपेक्षा जास्त नसावा. यापेक्षा चांगला असेल तर तुमच्यासाठी ते चांगलेच राहिल.

40 चा अर्थ

40 म्हणजे तुमचे डाउन पेमेंट. जेव्हा तुम्ही घर खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही डाऊन पेंमेट करावे लागते. आता तर ९५ टक्के लोन देखील होते. पण तुम्ही तसे करू नका. आपण घरासाठी 10 किंवा 20 टक्के डाउन पेमेंट करु शकता आणि उर्वरित रक्कम गृहकर्जाद्वारे घेऊ शकता. पण तुम्ही 40 टक्के डाउन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. तुमचे वार्षिक उत्पन्न जर 10 लाख रुपये आहे आणि तुम्ही 30 लाख रुपयांचा फ्लॅट विकत घेतलाय, तर तुम्ही 12 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फक्त 18 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. त्यामुळे इएमआय तुम्ही सहज भरु शकता.

उदाहरणातून समजून घ्या

तुमचे पॅकेज जर 9 लाख रुपये आहे आणि तुम्ही 27 लाख रुपयांना फ्लॅट घेतला. यासाठी तुम्हाला 10,80,000 रुपये डाउन पेमेंट करावा लागेल. तुम्ही मग 16,20,000 रुपयांचे गृहकर्ज घ्या. जर तुम्ही हे गृहकर्ज SBI कडून 20 वर्षांसाठी घेत असाल, तर SBI होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, तुम्हाला 9.55 टक्के व्याजदराने दरमहा 15,153 रुपये EMI म्हणून भरावे लागेल. ही अशी रक्कम आहे जी तुम्ही सहज परतफेड करू शकता. जरी वेळोवेळी व्याजदर वाढला आणि त्याचा तुमच्या EMI वर परिणाम झाला तरी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद
'आम्ही सगळ्यांना उडवून टाकू', बघा दादांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद.
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट
'माझ्या आईच आमच्यावर वचपा काढायची..', मुंडेंच्या मुलाची भावनिक पोस्ट.
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'
करुणा शर्मा प्रकरणाचा सदावर्तेंनी सांगितला अर्थ, 'कुणालाही जबरदस्तीने'.
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं
'यांना काय घेणं देणं...', सकाळचा भोंगा म्हणत दादांनी राऊतांना फटकारलं.
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप
'मुंडेंसमोरच कराडचा मला नको त्या ठिकाणी स्पर्श..', करुणा शर्मांचा आरोप.
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?.
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी.
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी.
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय.
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार.