
आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण आपल्या आहारात फळांचा समावेश करत असतो. यासाठी आपण बाजारातून फळे खरेदी करत असतो. त्यात आपण फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. फळं कुठून खराब आहे का पाहतो, कच्च तर नाहीये ना हे देखील पाहतो. फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेऊन सर्वजण फळं खरेदी करत असतो. परंतु तुम्ही अनेकदा पाहिले असेलच की फळांवर काही क्रमांकित स्टिकर्स चिकटवले जातात. सहसा हे स्टिकर्स सर्व प्रकारच्या फळांना लावले जातात, पण तुम्हाला हे स्टिकर्स का लावले जातात हे माहित आहे का? तसेच या स्टिकर्सवर लिहिलेल्या अंकांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल, तर आजच्या या लेखात आपण फळांवर स्टिकर्स का लावले जातात आणि त्यात लिहिलेल्या अंकांचा अर्थ काय आहे? ते जाणून घेऊयात…
फळांवर स्टिकर्स (फळांचा बारकोड क्रमांक) लावण्यामागे एक विशेष उद्देश असतो. खरं तर, हे स्टिकर्स फळं कुठे वाढवले आहे, ते वाढवण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली आहे हे समजण्यासाठी लावले जातात. तसेच त्या फळांची गुणवत्ता काय आहे आणि त्याची किंमत काय आहे हे देखील सांगते. हे स्टिकर्स PLU कोड म्हणजे (Price look-up code) आहेत, जे फळांची गुणवत्ता सांगतात . त्यावर एक विशेष क्रमांक लिहिलेला असतो, ज्याचे वेगवेगळे अर्थ असतात.
हे झाले स्टिकर्सबद्दल, आता प्रश्न असा पडतो की या स्टिकर्सवर लिहिलेल्या नंबरचा अर्थ काय आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, स्टिकर्सवर लिहिलेल्या नंबरचे वेगवेगळे अर्थ आहेत. चला जाणून घेऊया या वेगवेगळ्या नंबरच्या स्टिकर्सचा अर्थ-
जर तुम्ही फळे खरेदी करत असाल आणि त्यावर 4 अंकी संख्या लिहिलेली असेल तर ते फळ खरेदी करू नका. कारण 4 अंकी संख्या विशेषतः जर 4231 किंवा 4056, तर याचा अर्थ असा होतो की ही फळे वाढवण्यासाठी कीटकनाशकांचा आणि कॅमिकलचा वापर केलेला आहे.
काही फळे अशी आहेत त्यांच्यावर 5 अंकी संख्या असलेले स्टिकर्स चिटकवलेले असतात. तसेच यावरील संख्या 8 ने सुरू होतात. जर तुम्हाला फळांवर 85431 किंवा 82512 सारखे अंक लिहिलेले दिसले तर समजून घ्या की ही फळं अनुवांशिकरित्या सुधारित आहेत. याचा अर्थ असा की ही फळे नैसर्गिकरित्या पिकलेली नाहीत, तर प्रयोगशाळेत त्यावर प्रक्रिया करून तयार केलेले आहेत.
आता प्रश्न असा उद्भवतो की असे कोणतेही स्टिकर आहे का जे सांगते की फळ पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवले गेले आहे आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. खरं तर असे स्टिकर आहे. 9 नंबरने सुरू होणारे 5 अंकी क्रमांक असलेले स्टिकर्स, जसे की 93435 किंवा 95365, याचा अर्थ असा की ही फळे रसायने आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)