बॅचलर मुली लग्नाच्या वयाबाबत काय विचार करतात?; तुम्हालाही आश्चर्य वाटेल

मुलींचं लग्नाचं वय 18 वर्षांवरुन 21 वर्ष करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 2021 सालीच या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यासाठी बालविवाह प्रतिबंधक कायदा दुरुस्ती विधेयक दुरुस्तीसाठी संसदेत आणण्यात आले आहे. लग्नाचं किमान वय कमी करण्याच्या निर्णयावर मुला-मुलीचं काय मत आहे. पाहूयात...

बॅचलर मुली लग्नाच्या वयाबाबत काय विचार करतात?; तुम्हालाही आश्चर्य वाटेल
marriageImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Nov 24, 2023 | 5:18 PM

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : लग्नाच्या वयाचं प्रत्येक देशातील वेगवगळे असते. आता आपल्या देशात विवाहाचं किमान वय मुलांसाठी 21 तर मुलीचं वय 18 इतकं आहे. चाईल्ड मॅरेज प्रिव्हेन्शन एक्ट 2006 नूसार कमी वयात लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा आणि किमान एक लाख रुपयांचा दंड आहे. आता केंद्र सरकर मुलीच्या वयाची मर्यादा वाढवून 21 करण्याच्या विचारात आहे. यावरुन देशातील तरुणींच्या मनात विवाहाचं वय नेमकं किती असावं यावर काय चर्चा सुरु आहे ? याचा घेतलेला धांडोळा पाहूयात…

भारतातील मोठ्या शहरात शिक्षण आणि करियर याबद्दल तरुण आणि तरुणींच्या आकांक्षा वाढल्या आहेत. आता मुलींना करीयरला प्राधान्य देत स्वत:च्या पायावर उभे रहायचं आहे. बदलत्या काळानूसार करियर प्राधान्य दिल्याने भारतातील मोठ्या शहरात राहणाऱ्या मुलीचं लग्नं आता 21 वर्षांच्यानंतरच होत आहेत. या निर्णयाचा परिणाम आता छोट्या शहरापासून खेडेगावातही होणार आहे. गावात मुलांच्या तुलनेत शिक्षा आणि रोजगारात मुली कमजोर पडल्या आहेत. तसेच कुटुंबातही मुलींना कुपोषण आणि आरोग्यसुविधेच्या अभावाचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी लवकर लग्नं करावं लागतं. त्यामुळे बालविवाहासारख्या समस्यांचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक आहे. जर लग्नाचं किमान वयं वाढवलं तर या मुलीचे जीवनमान सुधारणार का ? असा सवाल केला जात आहे.

या परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. भारतातील राज्यात महिला आणि बाल आरोग्य, शिक्षण आदींवर काम करणाऱ्या संघटनांच्या मदतीने 12 ते 22 या वयोगटातील 2500 मुले-मुलींची मते आजमाविण्याचा प्रयत्न केला. मुलीचं लग्नाचं किमान वय 18 वरुन 21 करण्याला विविध प्रकाराची उत्तरं मिळाली. राजस्थानच्या अजमेर येथील ममता जांगिड यांनी किमान वय वाढविण्याचा सरकारचा प्रस्ताव पसंत पडला नाही.विशेष म्हणजे ती स्वत:च  बाल विवाहाची शिकार होण्यापासून सुदैवाने वाचली आहे.

समज आल्यावरच लग्न करावं

बंगलुरु येथील एडव्हर्टायझिंग कंपनीत काम करणाऱ्या सोमा भट्टाचार्जी यांनी सांगितले की लग्नाचं वय आपण जोपर्यंत मनाने तयार होत नाही तोपर्यंत येत नाही. भारतात सामाजिक दबावामुळे लग्न वयातच करण्याचा सल्ला दिला जातो. मुलींना त्यांच्या वाढत्या वयाची भीती घातली जाते असेही त्या म्हणाल्या. जोपर्यंत सर्व जबाबदारी पूर्ण करण्याची समज येत नाही तोपर्यंत लग्न करु नये असे ऑटोमोबाईल एक्सपर्ट अविजीत माधव यांनी म्हटलं आहे.

स्वावलंबी होणे महत्वाचे

अनेक महिला लग्न करण्यापूर्वी आर्थिक स्वावलंबनावर भर देत नाहीत. माझेही लग्न वडिलांनी 25 व्या वर्षी एका शिक्षकांशी लावून दिले. आमच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर माझ्या पतीची नोकरी गेली. आमच्याकडे भाडं भरायलाही पैसे नव्हते. नंतर माझ्या पतीला दुसरी नोकरी मिळाली आणि मी होम फूड डिलीव्हरी बिझनेस सुरु केला. आम्हाला आर्थिक स्थैर्य मिळायला भरपूर वर्षे लागली त्यामुळे लग्ना आधी मुलीने आर्थिक स्वावलंबी होणे महत्वाचे असल्याचे दिल्लीच्या अमीना यांनी सांगितले.

30 वयाच्या आतच लग्न

मुलीने 30 वयाच्या आतच लग्न करायला हवे, कारण या वयानंतर त्यांचा बायोलॉजिकल क्लॉक कमजोर होते. आता मुलं होण्यासाठी स्री बीज फ्रिज करणे किंवा IVF तंत्रज्ञान आले असले तरी किती महिलांना हा खर्च परवडणार ? असा सवाल शिक्षिका नैना सिंह यांनी म्हटले आहे.

अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?
अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, नवा CM कोण?.
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ
नादच खुळा... रथ, गाडी, टेम्पो सोडून बाप्पाचा 'रॉयल' थाट; बघा व्हिडीओ.
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप
पुण्यातील मानाच्या पहिल्या कसबा गणपती बाप्पाला निरोप.
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं
मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? मंत्री गिरीश महाजन यांनी थेट नावच घेतलं.
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच
मुंबईत बाप्पाच्या निरोपासाठी तुफान गर्दी, जिकडे नजर तिकडे गणेशभक्तच.
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या
पुण्यातील मानाच्या बाप्पांना निरोप देताना भव्य रांगोळ्यांच्या पायघड्या.
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?
त्यामध्ये मीही आलो... राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून काय म्हणाले दादा?.
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ
दादांनी 'या' मंत्र्यांसोबत वडापाव खाण्याचा घेतला आस्वाद, बघा व्हिडीओ.
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?
बोलता-बोलता तुमचाही फोन कट...जिओचं नेटवर्क अचानक गायब, नेमकं काय झालं?.
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?
'आमदार होऊ दे…'; लालबागच्या राजाच्या चरणी कोणी केली चिठ्ठी अर्पण?.