भारतात डाव्या बाजूने तर परदेशात उजव्या बाजूने का चालवतात गाडी? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल कारण

जगातील काही देशांमध्ये गाड्या डाव्या बाजूने चालवल्या जातात, तर काही देशांमध्ये उजव्या बाजूने. यामागे ऐतिहासिक कारणे आणि रस्ता सुरक्षिततेचे महत्त्वाचे पैलू आहेत. ते नेमके कोणते आहेत चला जाणून घेऊया...

भारतात डाव्या बाजूने तर परदेशात उजव्या बाजूने का चालवतात गाडी? ९९ टक्के लोकांना माहिती नसेल कारण
Driving
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Sep 08, 2025 | 3:50 PM

तुम्ही कार किंवा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास नक्कीच केला असेल. त्या वेळी तुमच्या लक्षात आले असेल की गाड्या ज्या बाजूने चालवल्या जातात, त्या बाजूच्या उलट बाजूस ड्रायव्हरची सीट असते. उदाहरणार्थ, भारतात गाड्या रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवल्या जातात, त्यामुळे ड्रायव्हरची सीट उजव्या बाजूला असते. अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये गाड्या उजव्या बाजूने चालवल्या जातात आणि तिथे ड्रायव्हरची सीट डाव्या बाजूलाच असते. आता सर्वांना प्रश्न पडतो की असे का आहे आणि या दोन पद्धतींपैकी कोणती अधिक सुरक्षित आहे? जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल, तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

डाव्या बाजूने गाडी चालवण्याचे ऐतिहासिक कारण

गाडी डाव्या बाजूने चालण्याची परंपरा ही कित्येक वर्ष जुनी आहे. पूर्वीच्या काळात लोक घोड्यावर किंवा बैलगाडीने प्रवास करत असत. त्या वेळी बहुतांश लोक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असत. यामागचे कारण असे होते की, जगातील बहुतांश लोक उजव्या हाताने काम करणारे (राइट-हँडेड) असतात. अशा परिस्थितीत गरज पडल्यास ते उजव्या हाताने शस्त्र पकडून स्वतःचा बचाव सहज करू शकत होते. ही सवय पुढेही कायम राहिली. 19व्या शतकाच्या अखेरीस जेव्हा गाड्यांचा वापर सुरू झाला, तेव्हाही अनेक देशांनी डाव्या बाजूने गाड्या चालवणे सुरू ठेवले. भारत हा त्यापैकीच एक देश आहे.

वाचा: लग्न ठरताच तरुण झाला उतावळा! सुहागरातीआधीच करु लागला ती मागणी, नंतर जे घडलं…

उजव्या बाजूने गाडी चालवण्याची सुरुवात

बहुतांश देशांनी हळूहळू उजव्या बाजूने गाडी चालवण्याची पद्धत स्वीकारली. यामागचे मोठे कारण म्हणजे 1792 मध्ये झालेली फ्रेंच क्रांती (French Revolution). त्या काळात फ्रान्समध्ये गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवण्यास सुरुवात झाली आणि पुढे युरोपातील अनेक देशांमध्ये पसरला. नंतर स्वीडननेही 1967 मध्ये उजव्या बाजूने गाडी चालवण्यास सुरुवात केली. यामागचे कारण असे होते की, रस्त्यावर उजव्या बाजूने गाडी चालवणाऱ्या देशांमधून आयात होणाऱ्या गाड्यांची संख्या सतत वाढत होती. शिवाय, रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही ही पद्धत अधिक सुरक्षित मानली गेली.

कोणती पद्धत अधिक सुरक्षित?

आजच्या घडीला जगातील बहुतांश देश रस्त्याच्या उजव्या बाजूने गाडी चालवण्याचे पालन करतात. अहवाल सांगतात की ही पद्धत रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अधिक सुरक्षित मानली जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालानुसार, ज्या देशांमध्ये गाड्या उजव्या बाजूने चालवल्या जातात, तिथे रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू डाव्या बाजूने गाडी चालवणाऱ्या देशांच्या तुलनेत खूपच कमी आहेत. एका अभ्यासात असेही आढळले की, उजव्या बाजूने गाडी चालवणाऱ्या देशांमध्ये वाहतूक अपघातांमध्ये 40% पर्यंत घट दिसून येते.