होमलोन सुरु असल्याच असा वाचवता येतो टॅक्स, पाहा त्यासाठी काय करावे

तुम्ही होमलोन घेतले असेल किंवा नवीन घर बांधण्यासाठी कर्ज घेतले असेल तर तुम्हाला तुमच्या उत्पन्नावरील टॅक्सवर सवलत मिळू शकते. यासाठी तुम्हाला क्लेम करता येतो. किती रुपयांसाठी तुम्ही हा क्लेम करु शकतात. किती रुपयांचा क्लेम तुम्हाला करता येतो जाणून घ्या सर्व माहिती.

होमलोन सुरु असल्याच असा वाचवता येतो टॅक्स, पाहा त्यासाठी काय करावे
home loan
Follow us
| Updated on: Apr 11, 2024 | 3:25 PM

Tax Benefits on Home Loan : सर्वसामान्य पगारदार लोकांना त्यांचा कमाईचा एक भाग टॅक्स म्हणून देखील भरावा लागतो. तुम्ही जर कर भरत असाल तर आयकर कायदा, 1961 अंतर्गत, भारतीय करदात्यांना अनेक प्रकारचे कर लाभ मिळतात. फक्त गुंतवणुकीवरच कर सवलत मिळते असे नाही, तर तुमचे काही मोठे खर्च विचारात घेऊनही तुम्हाला कर सवलत दिली जाते. आयकर नियमांनुसार होम लोन टॅक्स बेनिफिट्स आणि अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीवर टॅक्स सूट यांसारख्या फायद्यांचाही समावेश आहे. गृहकर्ज आणि मालमत्ता बांधकाम याबाबत काही अटी आहेत.

गृहकर्जावर किती कर सूट मिळते?

1. गृहकर्जाच्या व्याजावर कर सूट (कलम 24)

जर तुम्ही घर बांधण्यासाठी कर्ज घेतले असेल, तर तुम्ही कर्जावर भरलेल्या व्याजावर तुम्हाला कर सूट मिळू शकते. ही सूट तुमच्या स्वतःच्या वापरल्या जाणाऱ्या मालमत्तेसाठी देखील मिळू शकते. कमाल सूट 2 लाखांपर्यंत असते. पण जर मालमत्ता भाड्याने दिली असेल तर तुम्हाला संपूर्ण व्याजावर कर सूट मिळते.

2. मूळ रकमेवर कर सूट (कलम 80C)

तुम्ही गृहकर्जाच्या मूळ रकमेच्या परतफेडीवर कर सवलतीचा दावा करू शकता. ही सूट वार्षिक 1.5 लाखच्या एकूण सूट मर्यादेत येते.

3. नोंदणी शुल्कावरील कर सवलत (कलम 80C)

मालमत्ता खरेदी करताना भरलेले नोंदणी शुल्क देखील 80C अंतर्गत आयकर सवलत प्रदान करते.

4. प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसाठी (कलम 80EE)

प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांना अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते. कलम 24b अंतर्गत उपलब्ध असलेल्या 2 लाख रुपयांच्या सूट व्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या गृहकर्जावरील व्याजावर 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळवू शकता.

5. संयुक्त मालकांसाठी कर सूट

जर तुम्ही एखाद्या मालमत्तेचे संयुक्त मालक असाल किंवा एखाद्यासोबत संयुक्त कर्जदार म्हणून संयुक्त गृहकर्ज घेतले असेल, तर दोन्ही मालक स्वतंत्र भागीदारीसाठी कर सवलतीचा दावा करू शकतात.

घराच्या बांधकामावर कर सवलतीच्या अटी काय आहेत

जर तुम्हाला बांधकामाधीन मालमत्तेसाठी कर कपातीचा दावा करायचा असेल, तर तुम्हाला एका वर्षात भरलेल्या व्याजावर रु. 2 लाख आणि कलम 80C अंतर्गत रु. 1.5 लाखांपर्यंत कर कपात मिळू शकते. व्याजावरील ही सवलत घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मिळू शकते, त्यासाठी बांधकाम ५ वर्षांच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही वजावट 5 हप्त्यांमध्ये दावा केली जाऊ शकते. जर या 5 वर्षात घर बांधले नाही तर तुम्हाला भरलेल्या व्याजावर फक्त 30,000 रुपयांची सूट मिळू शकेल.

Non Stop LIVE Update
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले
छत्रपती संभाजीनगरातील सुखना धरण सुखले, शंखशिंपलेही तडफडून मेले.
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले
संजय राऊत गांजा पिऊन लेख लिहितात; देवेंद्र फडणवीस बरसले.
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार
मध्यरात्रीच डाव साधला, माजी महापौरांवर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार.
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड
सुषमा अंधारे यांनी पोलिसांसमोरच वाचलं वसुलीचं रेट कार्ड.
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार
ठाण्यात ढगाळ वातावरण... पावसाच्या हलक्या सरी कोसळणार.
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर
अतिउत्साही कार्यकर्त्यांची करामत, निकालापूर्वीच विजयाचे झळकवले बॅनर.
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?
भाई Google से कम नही...6 वर्षांच्या गुगुल बॉयची कमाल, कोण आहे चिमुकला?.
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?
योगी को बचाना है, तो मोदी को...रोखठोकमधून राऊतांनी काय केले मोठे दावे?.
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा
अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर..., शिरसाटांच्या दाव्यानं चर्चा.
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'
'शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते'.