ब्लिंकिटवर डिलिव्हरी बॉय एका ऑर्डरवर किती पैसे कमवतो? जाणून धक्का बसेल!
आपण सगळेच आता ब्लिंकिट सारखे प्लॅटफॉर्मवरून कितीतरी गोष्टी ऑनलाईन मागवतो. अगदी छोट्यातली छोटी वस्तू, सामान देखील आपण ब्लिंकिट करतो त्यामुळे वेळही वाचतो आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटांत ती वस्तू आपल्या दारापर्यंत पोहोचते. मी पण तुम्हाला माहितीये का की आपल्या दारापर्यंत ती वस्तू अगदी कमीवेळात पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी वर्कसना एका ऑर्डरच्या मागे किती पैसे मिळतात?

आजकाल आपण पाहिलं असेल की जवळपास सर्वचजण कपडे, भांडी किंवा मेकअपच्याच वस्तू ऑनलाईन मागवत नाही तर घराचा किराणा ते भाजीपाल्यापासून सगळंच ऑनलाईन मागवतात. त्यातील सध्या सगळ्यात जास्त आणि रोज वापरलं जाणारं अॅप म्हणजे ब्लिंकिट. सगळेचजण ब्लिंकिटवरून छोट्या-मोठ्या वस्तू मागवत असतात. अगदी 10 ते 15 मिनिटांत तुम्ही मागवलेल्या वस्तू तुमच्या दारापर्यंत पोहोचतात. त्यामुळे तुमची मेहनत आणि वेळ दोन्ही वाचते.
पण तुम्हाला माहितीये की आपलं सामान आपल्यापर्यंत 10-15 मिनिटांत पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला एका ऑर्डरवर किती पैसे मिळतात ते? जाणून थक्क व्हालं. चला जाणून घेऊयात.
कंटेंट क्रिएटरने अमनने ब्लिंकिट अॅप वापरून सगळाच डेमो दाखवला
एका YouTube व्हिडिओमध्ये, कंटेंट क्रिएटरने अमनने ब्लिंकिट अॅप वापरून रिअल-टाइम डिलिव्हरीचा डेमो दाखवला आहे. त्याने दाखवले की त्याला एक एक ऑर्डर मिळते आणि तो प्रति किलोमीटर किती कमावतो ते त्याने दाखवले.
ग्राहकाने ऑर्डर केल्यावर ती कशी डिलिव्हरी वर्कर्सपर्यंत पोहोचते?
पुढे त्याने पुढे ती प्रोसेस सांगितली की, “अॅपवर तुमची ऑर्डर घेण्यासाठी क्लिक करताच, एक लोकेशन ओपन होते. ती ऑर्डर पोहोचवण्याचे अंतर दाखवत होते ते अंदाजे 1,200 मीटर किंवा1.2 किलोमीटर आहे.” त्यानंतर तो म्हणतो की तो ग्राहकाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ऑर्डर डिलीव्हरी करणार आणि नंतर सर्वांना दाखवणार की त्याला किती पैसे क्रेडिट झाले.”
व्हिडिओमध्ये, तो दुकानातून ऑर्डर घेतो, ग्राहकाकडे जातो, रोख रक्कम गोळा करतो आणि डिलिव्हरी पूर्ण करतो. डिलिव्हरी पूर्ण झाल्यानंतर, अॅपवर आलेले पेमेंट डिटेल्सही दाखवतो.
एका ऑर्डरमागे मिळतात एवढे पैसे
आता त्याने झालेले अंतर 1100 मीटर दाखवले आणि त्यानंतर पेमेंटची रक्कम स्पष्टपणे दाखवली आहे. व्हिडिओमध्ये ऑर्डर घेण्यापासून ते डिलिव्हरीपर्यंत सर्वकाही त्याने पारदर्शकपणे दाखवले आहे. या डिलिव्हरीसाठी त्याला 22.46 रुपये मिळाले होते. म्हणजे एका ऑर्डरच्या मागे त्याला फक्त 22रुपये मिळाल्याचं त्याने स्पष्ट केले.
डिलिव्हरी बॉईजना प्रत्येक ऑर्डरसाठी मूळ वेतन मिळते, जे अंतरावर अवलंबून असते. किमान वेतन प्रत्येक 1 किमीसाठी 15 रुपयांपासून सुरू होते. त्यानंतर प्रति अतिरिक्त किलोमीटरसाठी 10 ते 14 रुपये मिळतात. 1.2 किमीसाठी, मूळ वेतन लागू होऊ शकते, कारण अतिरिक्त अंतर फक्त 0.2 किमी आहे.
ब्लिंकिट सारखे प्लॅटफॉर्म डिलिव्हरी पार्टनर्सना स्वतंत्र कंत्राटदार मानतात. प्रत्येक डिलिव्हरीनुसार त्यांचे पेमेंट आधारित असते . तसेच इंसेंटिव्स आणि बोनस देखील दिले जातात. तथापि, रिटर्न ट्रिप अनेकदा अनपेड जातात, ज्यामुळे वर्कर्सच्या अडचणीत भर पडते.
काही गोष्टींची दखल अॅपने घेतली पाहिजे
त्यामुळे हा व्हिडिओ हाइलाइट करतो की डिलिव्हरी कामांमध्ये डिस्टंस आणि पे हे बॅलेन्स असणं किती महत्त्वाचं असतं ते. तसेच व्हिडिओमध्ये त्या मुलाने देखील स्पष्ट केले आहे की पैसे देताना या अॅप्सनी इंधन खर्च, वाहतूक कोंडी म्हणजे ती ऑर्डर पोहोचवताना किती वेळ ट्राफिकमध्ये गेला आणि परतीच्या ट्रिपचा वेळ विचारात घ्यावा जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही.
