वीजेचा झटका देऊन अस्वल आणि बिबट्याच्या जोडप्याची शिकार, वन्यप्रेमी चिंतेत

चंद्रपूरच्या आयुध निर्माणी परिसरात चार वन्यजीव मृतदेहांची शिकार झाल्याचे निष्पन्न झालं (chandrapur 4 animal died) आहे.

वीजेचा झटका देऊन अस्वल आणि बिबट्याच्या जोडप्याची शिकार, वन्यप्रेमी चिंतेत

चंद्रपूर : चंद्रपूरच्या आयुध निर्माणी परिसरात चार वन्यजीव मृतदेहांची शिकार झाल्याचे निष्पन्न झालं (chandrapur 4 animal died) आहे. आयुध निर्माणी सारख्या संवेदनशील परिसरात शिकारीच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आयुध निर्माण या ठिकाणच्या 11 KV वीजेचा झटका देऊन शिकार करण्यात आली आहे. याबाबत वनविभागाच्या पथकाने तपास सुरु केला आहे.

दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहराजवळच्या आलेल्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या चांदा आयुध निर्माणी दारुगोळा कारखान्याच्या परिसरात मुक्तपणे वावरणाऱ्या बिबट्याच्या जोडीचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. कर्मचारी वसाहतींच्या आसपास फिरणारी ही जोडी अनेकांच्या काळजाचा ठाव चूकवून गेली होती. सोशल मीडियावरही याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते.

या जोडीचे व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आज सकाळी आयुध निर्माणी परिसरातील जंगलात 4 वन्यजीवांचे मृतदेह आढळल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. याबाबतचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यात एक बिबट्याचं जोडपं, तसेच एक अस्वलाचे जोडपे दिसत होते. या मृतदेहाच्या प्राथमिक निरीक्षणावरुन हा घातपात असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार वनाधिकाऱ्यांनी परिसराची कसून तपासणी सुरु केली (chandrapur 4 animal died) होती.

या तपासात या वन्यजीवांची 11 केवी उच्चदाबाच्या वीज वाहिनीच्या तारा टाकून शिकार झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. तसेच या घटनास्थळी इलेक्ट्रीक तारा असलेल्या काही सामग्रीही आढळली आहे. त्यानुसार हे कृत्य करणाऱ्या शिकाऱ्यांनाही अटक होईल असा विश्वासही वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आयुध निर्माणी परिसरातील घनदाट जंगलात वन्यजीवांची मोठी वस्ती आहे. हरिण आमि इतर प्राण्यांसह वाघ -बिबटे आणि अस्वल यांचा मुक्त वावर या भागात असतो. हीच गोष्ट लक्षात ठेवून शिकार्‍यांनी सापळा रचला असल्याचे वनधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.

वन्यजीवांची शिकार झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून चार उमद्या वन्यजीवांचा मृत्यूने वन्यजीवप्रेमी चिंतेत पडले आहेत. घटनास्थळावरून शिकारीशी संबंधित सामानही ताब्यात घेण्यात आली असून आरोपी लवकरच ताब्यात येतील असा विश्वास वनाधिकार्‍यांनी व्यक्त केला (chandrapur 4 animal died) आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI