बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइडचं अति प्रमाणात सेवन, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंब्रा येथील तरुण बॉडीबिल्डरचा अति प्रमाणात स्टेरॉइड घेतल्याने मृत्यू (Bodybuilder death due to steroid) झाला आहे. नावेद जमील खान (23) असं या बॉडीबिल्डरचं नाव आहे.

बॉडीबिल्डिंगसाठी स्टेरॉइडचं अति प्रमाणात सेवन, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू

ठाणे : मुंब्रा येथील तरुण बॉडीबिल्डरचा अति प्रमाणात स्टेरॉइड घेतल्याने मृत्यू (Bodybuilder death due to steroid) झाला आहे. नावेद जमील खान (23) असं या बॉडीबिल्डरचं नाव आहे. नावेद कौसा येथील चंदननगर परिसरातील अशरफ कंपाऊंडमध्ये राहतो. 26 जानेवारी रोजी त्याचे निधन (Bodybuilder death due to steroid) झाले.

“नावेद नियमित जिममध्ये जात होता. 26 जानेवारी रोजी त्याने बॉडीबिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला होता. जिथे त्याला जिंकल्यावर प्रशिक्षक होण्याचे वचन देण्यात आले होते. त्यामुळे नावेद जिम व्यतिरिक्त शरीर तयार करण्यासाठी सप्लीमेंट्स आणि स्टेरॉइड्सचे सेवन करत होता”, असं नावदेची आई रेश्मा खान यांनी सांगितले.

नावेदच्या वैद्यकीय अहवालात आणि प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट सांगितले आहे की, स्टेरॉइड्स अति प्रमाणात घेतल्याने त्याची प्रकृती खालावली आणि त्याचे यकृत कार्य करणे बंद झाले. त्यानंतर त्याला प्रथमच कौसा येथील बिलाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तीन दिवस उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला केईएम रुग्णालयात पाठवले. पण तेथेही डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर आता काहीही होऊ शकत नाही असे सांगत त्याला घरी पाठवले. घरी परत येत असताना रुग्णवाहिकेत त्याचा मृत्यू झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI