AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हैदराबादला कत्तलीसाठी नेत असलेल्या 57 उंटांना अकोल्यात जीवदान

गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला : उंटांची तस्करी पुन्हा एकदा समोर आली आहे. राजस्थानमधून तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 57 उंटांना सोमवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे जीवदान मिळालं. हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पातूर पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. उंटांची किंमत सुमारे 57 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. […]

हैदराबादला कत्तलीसाठी नेत असलेल्या 57 उंटांना अकोल्यात जीवदान
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी, अकोला : उंटांची तस्करी पुन्हा एकदा समोर आली आहे. राजस्थानमधून तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या 57 उंटांना सोमवारी सायंकाळी अकोला जिल्ह्यातील पातूर येथे जीवदान मिळालं. हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन पातूर पोलिसांनी उंट ताब्यात घेतले. उंटांची किंमत सुमारे 57 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. उंटांच्या तस्करीमागे आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

अकोलामार्गे 57 उंट हैदराबाद येथे नेण्यात येत असल्याची माहिती हैदराबाद येथील पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास त्यांनी पातूर तालुक्यातील चिचखेड फाट्यानजीक उंट ताब्यात घेतले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी पातूर पोलीस ठाणे गाठले असता पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पशू संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावतीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे धाव घेतल्यानंतर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.

राजस्थान सरकारने उंट हा अति संरक्षित प्राणी घोषित केला आहे. इंटरनॅशन युनियन फॉर कंझवर्हेशन ऑफ नेचर अ‍ॅण्ड नॅचरल रिसोर्सेस या आंतरराष्ट्रीय संस्थेने तर उंट हा जवळपास विलुप्त झालेला प्राणी घोषित केला आहे. उंटांच्या संरक्षणासाठी राजस्थान सरकारने 2015 मध्ये कायदा पारित केला. तरीही दरवर्षी राजस्थानातून शेकडो उंटांची पश्चिम बंगाल, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये कत्तलीसाठी तस्करी केली जाते. पश्चिम बंगालमधून उंट पुढे बांगलादेशातही नेले जातात. राजस्थानातून एका उंटाची दहा ते पंधरा हजारात खरेदी केली जाते आणि कत्तलखान्यांना सुमारे एक लाख रुपयात विक्री केली जाते.

फूड अ‍ॅण्ड सेफ्टी स्टँडर्डस् अ‍ॅक्टनुसार उंटाचे मांस अखाद्य घोषित करण्यात आले आहे. भारतीय पशू कल्याण मंडळाने 14 ऑगस्ट 2017 रोजी तसे परिपत्रकदेखील जारी केले आहे. तरीही देशाच्या काही भागांमध्ये उंटाचे मांस भक्षण केले जाते आणि त्याच्या कातडीचेही विविध उपयोग आहेत. त्यामुळे उंटांना मोठी मागणी आहे. या अवैध व्यवसायात दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. उत्तर प्रदेशमधील बागपत आणि गाझियाबाद आणि हरियाणातील मेवात ही उंट तस्करांची मोठी केंद्रे आहेत.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी उस्मानाबादजवळ कारवाई करत 14 उंटांची सुटका केली होती. पण या उंटांना एवढ्या अमानुष पद्धतीने ट्रकमध्ये भरण्यात आलं होतं, की त्यांचा काही दिवसातच मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा यापद्धतीने उंटांची तस्करी समोर आल्याने विलुप्त होत असलेल्या प्रजातीही सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.