AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉम्प्युटरसमोर बसून वजन वाढलं, भारतातील 63 टक्के कर्मचारी लठ्ठ

भारतातील 63 टक्के कर्मचारी हे लठ्ठपणाच्या आजारापासून (Indian employees are overweight) त्रस्त आहे. हे सर्वेक्षण गेल्या 12 महिन्यातील (Indian employees are overweight) आहे

कॉम्प्युटरसमोर बसून वजन वाढलं, भारतातील 63 टक्के कर्मचारी लठ्ठ
| Edited By: | Updated on: Sep 24, 2019 | 12:16 PM
Share

नवी दिल्ली : लठ्ठ होणे ही आजकाल सर्वात मोठी समस्या बनली आहे. नुकतंच हेल्दीफायमी (HealthifyMe) या एका फिटनेस अॅप ने भारतातील लठ्ठपणावर एक सर्वेक्षण केले आहे. यानुसार भारतातील 63 टक्के कर्मचारी हे लठ्ठपणाच्या आजारापासून (Indian employees are overweight) त्रस्त आहे. यांचा उंची आणि वयाच्या तुलनेतील वजनानुसार असलेला बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) हा 23 पेक्षा जास्त आहे. हे सर्वेक्षण गेल्या 12 महिन्यातील (Indian employees are overweight) आहे

हेल्दीफायमी या अॅप ने दिलेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षणात 60 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात या कर्मचाऱ्यांचा दररोजच्या खाण्या-पिण्याचा समावेश आहे. यात प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, बेंगळूरु, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता या शहरांसह झागडिया, खंडाळा, वापी या ठिकाणी काम करण्याचा समावेश आहे. यात 21 ते 60 वर्षापर्यंत सेल्स, आयटी, बँकींग यासारख्या इतर कामगार वर्गाचा समावेश आहे.

वर्षभरातील या सर्वेक्षणानुसार, भारतातील 63 टक्के लोक लठ्ठपणाने ग्रस्त (Indian employees are overweight) असतात. त्यांचा बीएमआय हा 23 आहे. जागतिक आरोग्य संस्थेनुसार, निरोगी माणसाचा बीएमआय हा 18.5 ते 24.9 असणे गरजेचा आहे. तर 25 ते 30 मध्ये बीएमआय असणे हे लठ्ठपणाचे लक्षण आहे.

लठ्ठपणाची प्रमुख कारणे 

  • ऑफिसमध्ये तासनतास कॉम्प्युटरसमोर बसून राहणे.
  • भूक लागल्यानंतर पिझ्झा, बर्गर यासारखे फास्टफूड खाणे.
  • जेवण झाल्यानंतर चालायला किंवा फिरायला न जाता झोपणे.
  • सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर औषधांचे अतिसेवन करणे.
  • योगा आणि व्यायाम न करणे.

यात कर्मचारी दिवसभर किती चालतात याचेही सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार माल वाहतूक क्षेत्रात काम करणारे कर्मचारी सर्वाधिक 5 हजार 988 पावले दर दिवशी चालतात.

सर्वात कमी चालणाऱ्यांमध्ये (Indian employees are overweight) आर्थिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ते दर दिवशी 4 हजार 969 पावलं चालतात. रिटेल, मन्युफॅक्चरिंग, मार्केटींग आणि आयटी यासारख्या क्षेत्रातील कर्मचारी दिवसाला 5 हजार पाऊल चालतात.

या आकडेवारीनुसार काम करणाऱ्या प्रत्येक पुरुष आणि महिलांना धावणे सर्वाधिक पसंत आहे. धावण्याशिवाय सायकल चालवणे, जिममध्ये व्यायाम करणे, पोहणे हे पुरुषांना आवडते. तर महिलांनी घरगुती व्यायामला पसंती दर्शवली असून त्यांना योगा आणि घरातील काम करण्यात आवडतात. यामुळे कॅलरी बर्न रेटमध्ये दररोजच्या तुलनेने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅलरी बर्न रेट 300 वरुन 250 पर्यंत आला आहे.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.