विजय माल्ल्‍या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीच नाही, तर 2015 नंतर देशातून 72 ‘घोटाळेबाज’ फरार

| Updated on: Feb 08, 2020 | 7:19 AM

मोठे आर्थिक घोटाळे करुन पळून जाणाऱ्या उद्योजकांची यादी मोठी आहे. स्वतः परराष्ट्र मंत्रालयानेच लोकसभेत माहिती देताना हे कबूल केलं आहे.

विजय माल्ल्‍या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीच नाही, तर 2015 नंतर देशातून 72 घोटाळेबाज फरार
Follow us on

नवी दिल्ली : नीरव मोदी, विजय माल्ल्‍या, मेहुल चोकसी, ललित मोदी हे व्यावसायिक मोठे आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळाले. त्यानंतर यांचं नावं देशभरात चर्चेत आलं. मात्र, मोठे आर्थिक घोटाळे करुन पळून जाणाऱ्या उद्योजकांची यादी मोठी आहे (List of Fraud Indian buisinessman). 2015 नंतर अशाप्रकारे आर्थिक घोटाळ्याचे आरोप असलेले तब्बल 72 भारतीय व्यावसायिक परदेशात पळून गेले. स्वतः परराष्ट्र मंत्रालयानेच लोकसभेत माहिती देताना हे कबूल केलं आहे.

लोकसभेत सादर झालेल्या यादीत आर्थिक व्यवहारात अनियमितता आणि घोटाळे केल्याचे गंभीर आरोप असलेल्या व्यावसायिकांची नावं आहेत. या सर्वांना पुन्हा भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

आर्थिक घोटाळे करुन परदेशात पळून गेल्याचा आरोप असलेले भारतीय व्यावसायिक

विजय माल्ल्‍या, जतिन मेहता, सन्‍नी कालरा, संजय कालरा, एस. के. कालरा, पुष्‍पेश वैद्य, आशीष जोबनपुत्र, आरती कालरा, वर्षा कालरा, उमेश पारेख, कमलेश पारेख, निलेश पारेख, एकलव्‍य गर्ग, नीरव मोदी, नीशल मोदी, मेहुल चोकसी, विनय मित्‍तल, सब्‍या सेठ, राजीव गोयल, अल्‍का गोयल, ललित मोदी, दीप्तिबेन चेतनकुमार संदेसरा, नितिन जयंतीलाल संदेसरा, रितेश जैन, हितेश पटेल, मयूरीबेन पटेल, प्रीत‍ि आशीष जोबनपुत्र आणि इतर.

वरील सर्व व्यावसायिकांच्या प्रकरणांमध्ये 2015 पासून तपास सुरु आहे. वेगवेगळ्या तपास संस्थाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती लोकसभेत सादर केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, “हे आरोपी देशात वास्तव्यास आहेत की नाही याचा तपास सुरु आहे. त्यांचा पत्ता शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस आणि रेड कॉर्नर नोटीस काढण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रत्‍यार्पणासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत.”

4 जानेवारी 2019 रोजी तत्‍कालीन अर्थ राज्यमंत्री एस. पी. शुक्‍ला यांनी लोकसभेमध्ये 27 आरोपी व्यावसायिकांची नावं सांगितली होती. हे सर्व देखील मागील 5 वर्षात देश सोडून पळून गेले होते.

संबंधित बातम्या :

आणखी एक नीरव मोदी पसार, 14 बँकाना 3,592 कोटी रुपयांचा चुना

मला भारताकडे सोपवलं तर मी जीव देईन, नीरव मोदीची युके न्यायालयाला धमकी

पळपुट्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये बेड्या

List of Fraud Indian buisinessman