आणखी एक नीरव मोदी पसार, 14 बँकाना 3,592 कोटी रुपयांचा चुना

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीनंतर आता आणखी एका घोटाळ्याचे (Big Bank Scam in Mumbai) प्रकरण समोर आलं आहे.

Big Bank Scam in Mumbai, आणखी एक नीरव मोदी पसार, 14 बँकाना 3,592 कोटी रुपयांचा चुना

मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीनंतर आता आणखी एका घोटाळ्याचे (Big Bank Scam in Mumbai) प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये एका कंपनीवर सरकारी बँकेने मोठी रक्कम न भरल्यामुळे फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. फ्रॉस्ट इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. सीबीआयने या कंपनी आणि त्यांचे डायरेक्टर्स उदय देसाई आणि सुजय देसाईंसह 13 लोकांविरोधात 14 सरकारी बँकेंची फसवणूक केल्याची तक्रार दाखल (Big Bank Scam in Mumbai) केली आहे.

बँक ऑफ इंडियाच्या कानपूर ऑफिसच्या तक्रारीनंतर सीबीआयने ही कारवाई केली आहे. कानपूर, दिल्ली, मुंबईसह देशातील अनेक शहरामध्ये या कंपनीसंबंधित अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. त्यासोबत आरोपींच्याविरोधात लुकआऊट सर्कुलरही जारी करण्यात आले आहे.

या कंपनीचे रजिस्टर ऑफिस मुंबईत आहे. त्यासोबत बांगलादेश, चीन, सऊदी अरब, अमेरिका, कंबोडिया, स्वझरलँडसह इतर अनेक देशात ही कंपनी आयात निर्यात करते.

“कंपनीच्या वस्तूंच्या खरेदीत आणि लेनदेन प्रकरणातही घोटाळा झाल्याचे दिसत आहे. कंपनी आणि त्यांच्या डायरेक्टर्सने बँकेसोबत तीन हजार 592 कोटींची फसवणूक केली आहे”, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *