AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आली साहित्याची वारी , गोरोबांच्या दारी’, मराठी साहित्य संमेलनाचं आगळं वेगळं थीम सॉंग लॉन्च

यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं थीम सॉन्ग प्रकाशित करण्यात आलं आहे. 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (93rd literature festival theme song launch) उस्मानाबाद शहरात आयोजित करण्यात आलं आहे.

'आली साहित्याची वारी , गोरोबांच्या दारी', मराठी साहित्य संमेलनाचं आगळं वेगळं थीम सॉंग लॉन्च
| Edited By: | Updated on: Jan 01, 2020 | 5:54 PM
Share

उस्मानाबाद : यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं थीम सॉन्ग प्रकाशित करण्यात आलं आहे. 10 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (all india marathi literature festival theme song launch) उस्मानाबाद शहरात आयोजित करण्यात आलं आहे. ‘आली साहित्याची वारी , गोरोबांच्या दारी’ असे या थीम सॉन्गचे बोल आहे. यामध्ये संत गोरोबा काका, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या महिम्यासह साहित्याचा जागर करण्यात आला आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुंडे- मुधोळ यांच्या हस्ते याचे आकाशवाणीवरुन प्रकाशन (all india marathi literature festival theme song launch) करण्यात आले.

संत गोरोबा काका यांना भेटण्यासाठी 12 शतकात संत ज्ञानेश्वर माउली, सोपानदेव, निवृत्तीनाथ, संत नामदेव यांच्यासह इतर संत येथे आले होते. आताही साहित्याची वारी उस्मानाबाद जिल्ह्यात येत आहे. याच धर्तीवर प्रसिद्ध गीतकार वैभव देशमुख लिखित या गाण्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील सांस्कृतिक वारसासह ढोल, संबळ, खंजिरी आदी पारंपरिक वाद्य या गाण्यात वाजणार असून हृषीकेश यांनी हे संगीतबद्ध केलं आहे, अशी माहिती कार्यवाह रवींद्र केसकर यांनी दिली.

उस्मानाबाद शहरात संत गोरोबा काका साहित्यनागरी येथे होणाऱ्या अखिल भारतीय संमेलनाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. 3 जानेवारी रोजी संमेलनाच्या जनजागृतीसाठी साहित्याची ज्योत अचलबेट येथून काढण्यात येणार आहे. त्याचा समारोप 4 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे होणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी दिली आहे.

उस्मानाबाद येथे 10 ते 12 जानेवारी दरम्यान होणाऱ्या संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर पारंपरिक गोंधळ, कवीसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, कथा कथन, कवी कट्टा , बालकुमार मेळावा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 3 साहित्यमंच उभारणी सुरु आहे. या मंचाना शाहीर अमर शेख, दत्तो अप्पाजी तुळजापूरकर, सेतू माधव पगडी यांची नवे देण्यात आली आहेत, तर तुळजाभवानी देवीचे मंदिर आणि रूप असलेल्या देखाव्यासह भाई उद्धवराव पाटील यांच्या नावाने संमेलनाचे प्रवेशद्वार असणार आहे.

देशातील 600 कवी 3 दिवसात कवितांचे सादर करतील. साहित्य संमेलनाची स्मरणिका ‘पोत’ या नावाने प्रकाशित करण्यात येणार आहे. यात उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकभाषा, लोकजागर, साहित्य, संस्कृती आणि पर्यटनाची माहिती असणार आहे. पोत म्हणजे दर्जा आणि आई तुळजाभवानी देवीचे आराध्य घालण्यासाठी हातात नाचवण्यासाठी घेतलेला पोत या 2 अर्थाने परिपूर्ण असलेली स्मरणिकेचे काम अंतीम टप्प्यात असल्याची माहितीही रवींद्र केसकर यांनी दिली.

उस्मानाबाद शहरात होणाऱ्या या संमेलनाच्या मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु असून जिल्ह्यातील अनेक मंडळी 30 वेगवेगळ्या समितीच्या देखरेखीखाली जय्यत तयारी करीत आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.