पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर, माजी सैनिक पत्नींच्या महिला बचत गटातर्फे धावणार 44 बसेस

महिन्याला 6000 किलोमीटर प्रमाणे याचा फायदा 9 जिल्हयातील माजी सैनिक महिला बचत गटाच्या महिलांना होणार आहे.

पुणेकरांचा प्रवास होणार सुखकर, माजी सैनिक पत्नींच्या महिला बचत गटातर्फे धावणार 44 बसेस

सातारा : माजी सैनिक पत्नींच्या संचलित महिला बचत गटाच्या माध्यमातून पुणे शहरात 44 बसेस धावणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. विश्वयोध्दा शेतकरी मल्टी ट्रेड सातारा या कंपनीचे सुरेश गोडसे यांच्या पुढाकारातुन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे या संस्थेच्या 44 बसेस पुणे शहरात धावणार असून याचा शुभारंभ सातारा जिल्हयासह 9 जिल्हयात एकाच वेळी झाला. (a 44 buses will run in Pune city through Mahila Bachat Group run by ex servicemen wives)

यावेळी कर्नल आर.आर. जाधव, कंपनीचे संस्थापक सुरेश गोडसे उपस्थित होते. यावेळी एकाच वेळी 9 जिल्हयात हा कार्यक्रम पार पडला. साताऱ्यातील चिंचणेर वंदन या गावात बचत गटातील महिलांनी बसचं पुजन केलं. PMPML सोबत झालेल्या करारानुसार 57 रुपये 17 पैसे प्रति किलोमीटर बसचा करार झाला आहे.

महिन्याला 6000 किलोमीटर प्रमाणे याचा फायदा 9 जिल्हयातील माजी सैनिक महिला बचत गटाच्या महिलांना होणार आहे. या कंपनीद्वारे माजी सैनिक संघटनेमार्फत 9 जिल्हयात 44 बचत गटांना एकुण 44 बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बचत गटांना माजी सैनिक

कल्याण विभागा तर्फे 3 वर्षे 10 लाखाची सबसिडी दिली जाणार आहे. यामुळे प्रत्येक महिन्याकाठी बसचा सर्व खर्च जाऊन प्रत्येक बचतगटाला 25000 इतके उत्पन्न होणार असल्याची माहिती सुरेश गोडसे यांनी दिली आहे.

तर 9 जिल्हयांमध्ये कार्यरत असणारया 44 बचत गटामध्ये 600 महिला कार्यरत आहेत यामध्ये विधवा महिलांनाही स्थान देण्यात आलं आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाचा पाया ग्रामीण भागात भक्कम होण्यास नक्कीच मदत होणार आहे.

इतर बातम्या – 

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

सुजय‌ विखेंचं पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह बड्या नेत्यांना दिवाळी गिफ्ट, खास ‘साई ब्लेसिंग बॉक्स’ पाठवला

कोरोना संकटात घरखरेदी अधिक सुलभ, MCHI चे ऑनलाइन पोर्टल

(a 44 buses will run in Pune city through Mahila Bachat Group run by ex servicemen wives)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI