उरणमधील इमारतीला भीषण आग, महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली

उरण शहरातील प्रतीक अपार्टमेंटमध्ये आज पहाटेच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली.

उरणमधील इमारतीला भीषण आग, महावितरणच्या कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मोठी हानी टळली
| Updated on: Nov 03, 2020 | 11:45 AM

रायगड : उरण (Uran) शहरातील प्रतीक अपार्टमेंटमध्ये (Pratik apartment) आज पहाटेच्या सुमारास आगीची दुर्घटना घडली. परंतु येथील महावितरणचे कर्मचारी सम्राट बहादुरे यांनी दाखवलेल्या प्रसगांवधानामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. (A fire broke out in Pratik apartment in Uran city)

शहरातील विमला तलावाला लागून असलेल्या नागाव रोडवरील प्रतीक अपार्टमेंटच्या ग्राऊंड फ्लोअरवर पहाटे 6.15 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ग्राऊंड फ्लोअरवर सर्व रहिवाशांचे विजेचे मीटर आहेत, सर्वांच्या घरातील विजेचे मुख्य कनेक्शन येथूनच आहेत. त्याजवळ असलेल्या विद्यूत वाहिणीला शार्टसर्कीटमुळे आग लागली होती.

उरणमधील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कपंनीचे कर्मचारी सम्राट बहादुरे याचवेळी सदर इमारतीजवळ असलेल्या उद्यानात व्यायाम आणि मॉर्निंग वॉकसाठी आले होते. शर्टसर्किटमुळे आग लागल्याचे त्यांना कळताच त्यांनी जवळच असलेल्या विद्यूत डीपीतील मुख्य बटण बंद केले.

मुख्य स्विच बंद केल्यानंतर बहादुरे इमारतीत गेले आणि त्यांनी भडकलेल्या आगीवर रेती टाकली. त्यांचे प्रयत्न पाहून आसपास असलेल्या रहिवाशांनीदेखील त्यांची मदत करत जळत असलेल्या विद्युत वाहिणीवर रेती टाकून आग विझवली.

संबंधित बातम्या

मुंबईत वीजपुरवठा ठप्प होणार नाही; उरण येथे एक ते दोन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

उरण जंगलात शिकाऱ्यांचा हैदोस, मृतावस्थेत लांडोर सापडल्या, 4 शिकारी ताब्यात

मत्स्यप्रेमींना हवाहवासा ‘जिताडा’ उरणमध्ये सापडला, 35 किलोच्या माशाची किंमत ऐकून थक्क व्हाल!

भीषण धडकेत दोन्ही वाहनांनी घेतला पेट, आगीत होरपळून 5 जणांचा जागीच मृत्यू

BREAKING | नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या घराला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश

(A fire broke out in Pratik apartment in Uran city)