उरण जंगलात शिकाऱ्यांचा हैदोस, मृतावस्थेत लांडोर सापडल्या, 4 शिकारी ताब्यात

मागील दोन महिन्यांपासून कोप्रोली ते पुनाडे कलंबूसरे डोंगर परिसरात शिकार होत असल्याचे दिसत होते.

उरण जंगलात शिकाऱ्यांचा हैदोस, मृतावस्थेत लांडोर सापडल्या, 4 शिकारी ताब्यात
Follow us
| Updated on: Jul 10, 2020 | 5:21 PM

उरण : उरणच्या कोप्रोली गावाजवळच्या जंगलात (Hunters In The Uran Forest) शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकून भेकरचा मृत्यू झाल्याची घटना जून महिन्यात घडली. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी (9 जुलै) याच जंगलात मृतावस्थेत लांडोर सापडला. लांडोरच्या शिकारीसाठी आलेल्या चौघांना जिव्हाळा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि गावकरी मंडळींनी पकडलं आहे (Hunters In The Uran Forest).

काल (9 जुलै) दुपारी घडलेल्या या प्रकरणानंतर जिव्हाळाच्या कार्यकर्त्यांनी वन अधिकाऱ्यांना बोलावून ही कारवाई केली. पनवेल तालुक्यातील डोलवर परिसरातील हे चार शिकारी 21 ते 27 वयाचे युवक असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे भेकर शिकार प्रकरण झालेले असतानाही वन खात्याने कोप्रोलीच्या डोंगर भागात स्वतःहून गस्त वाढविणे, सुरक्षा रक्षक वाढविणे यापैकी काहीही केलेले नसल्याची माहितीही या निमित्ताने स्पष्ट झाली आहे.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

उरणच्या पूर्व भागातील कोप्रोली परिसरात जंगल संवर्धनाचे काम काही वन्यजीव प्रेमी आणि वनप्रेमी करत आहेत. या निमित्ताने सुमारे लाखभर झाडांचे रोपण मागच्या काही वर्षात झालं आहे. ते अजूनही चालू आहे. येणाऱ्या पिढ्यांना ती भेट म्हणून हे काम वन्य प्रेमींकडून केले जात आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून कोप्रोली ते पुनाडे कलंबूसरे डोंगर परिसरात शिकार होत असल्याचे दिसत होते.

रानवाटा तुडवत असताना अनेकदा वाटेत लावलेले फासे उडवण्याची कामं नित्यनेमाने जिव्हाळाचे कार्यकर्ते अगदी जिव्हाळ्याने करीत आले आहेत. मागील महिन्यात एका सुंदर अशा नर जातीच्या तरुण उमद्या भेकराचा मृत्यू अशाच प्रकारे अज्ञातांनी लावलेल्या फासकीच्या तारेत अडकून झाला होता (Hunters In The Uran Forest).

या जंगलात अनेकदा वन्यजीवप्रेमींना मोर, भेकर, डुक्कर, ससे असे अनेक प्राणी-पक्षी पाहायला मिळत असतात. मात्र, काळीज पिळवटून टाकणारी त्या भेकराच्या शिकारीनंतर वन्यजीप्रेमी वनविभाग सतर्क आपणच सतर्क राहायचे असे ठरवून होते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून वन्यजीव प्रेमी सातत्याने या भागात फिरत होते. त्यातूनच त्यांना बुधवारी काहींनी जाळे टाकले आहे आणि ते निघून गेले असल्याची माहिती मिळाली. त्यातूनच सावध झालेल्या वन्यजीवप्रेमी सदस्यांनी गुरुवारी त्या शिकारींना धडा शिकविण्याचा निश्चय करुन तो तडीस नेण्याचे ठरविले होते.

त्यानुसार, गुरुवारी काही सदस्य रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारीतच होते. त्यामध्ये यतीन, अश्विन आणि आनंद, बेलवाडीतील विजय कातकरी असे अनेकजण शिकारींच्या मागावर राहिले. त्यातूनच मोठे घबाड या कार्यकर्त्यांच्या हाती लागले असून त्यांनी लागलीच वनाधिकारी विभागाला पाचारण करुन ही बाब कानावर घातली. त्यांनी लगेच आपले अधिकारी पाठवले त्यामध्ये राऊतराय, वनरक्षक ढोले, इंगोले, बोरसे आदींनी धडक देत त्या शिकारींना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे सहा जिवंत लावरे पक्षी, तर एक मृत पक्षी प्राथमिक माहितीनुसार लांडोर मृतावस्थेत मिळून आला आहे.

याप्रकरणी मुकेश पाटील (वय 30), अझित गायकर (वय 26), प्रेमवाथ गायकर (वय 25) आणि चंद्रकांत पाटील (वय 32) या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय वन्यजीव कायदा 1972 च्या कलम 9 नुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती वन अधिकारी शशांक कदम यांनी दिली आहे. त्या सर्वांना आज पाणेवळ येथील जिल्हा कोर्टात हजर करण्यासाठी घेऊन गेले आहेत.

Hunters In The Uran Forest

संबंधित बातम्या :

चंद्रपुरात मालगाडीच्या धडकेत 11 रानडुकरांचा मृत्यू, वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.