मुंबईत वीजपुरवठा ठप्प होणार नाही; उरण येथे एक ते दोन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश

मुंबईतील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी ठप्प झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबईत वीजपुरवठा ठप्प होणार नाही; उरण येथे एक ते दोन हजार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 9:50 PM

रायगड : मुंबईतील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी ठप्प झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वीजनिर्मिती क्षमता वाढविण्यासाठी उरण येथील वायू विद्युत निर्मिती केंद्राची क्षमता वाढविण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. (Power supply to Mumbai will not be disrupted, Dr. Nitin Raut directs to set up a power plant with a capacity of one to two thousand megawatts at Uran)

यासाठी उरण येथेच विद्यमान प्रकल्पातील रिक्त जागेवर नवे किमान एक ते दोन हजार मेगावॅट क्षमतेचे वायू विद्युत निर्मिती केंद्र येत्या 2 वर्षांत उभे करण्याच्या सूचना डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

राऊत यांनी आज उरण वायू विद्युत निर्मिती केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांच्यासमोर एक सादरीकरण करण्यात आले. या केंद्राची क्षमता कशी वाढवता येईल, याबाबत सखोल चर्चा यावेळी करण्यात आली.

“मुंबईत पीक टाईमला सध्या वीजेची गरज 2800 मेगावॅट असते आणि 2030 पर्यंत ही गरज 5 हजार मेगावॅट असेल. तसेच 12 ऑक्टोबरला झालेली वीज खंडित होण्याची घटना लक्षात घेता मुंबई आणि परिसरात वीज निर्मिती होणे गरजेची आहे. मात्र सध्या केवळ सर्व कंपन्याची मिळून केवळ 1300 मेगावॅट वीजनिर्मिती होते”.

“12 ऑक्टोबरला मुंबईबाहेरून होणारा वीज पुरवठा ठप्प झाल्याने मुंबईतील आयलँडिंग यंत्रणा कोलमडली, मुंबई अंधारात गेली. हे टाळण्यासाठी उरण येथे किमान 1 ते 2 हजार मेगावॅटचा वीज प्रकल्प उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे महाजनको कंपनीला असा प्रकल्प अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

मुंबईत वीज ठप्प होण्यावरून सरकारने नेमली चौकशी समिती; दोषींवर कठोर कारवाईचे ऊर्जामंत्र्यांचे संकेत

मुंबईतील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता- नितीन राऊत

नाशिकमध्ये एकाच दिवसात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, दोघांचा वीज पडून, तर एकाचा विजेच्या धक्क्याने बळी

(Power supply to Mumbai will not be disrupted, Dr. Nitin Raut directs to set up a power plant with a capacity of one to two thousand megawatts at Uran)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.