AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये एकाच दिवसात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, दोघांचा वीज पडून, तर एकाचा विजेच्या धक्क्याने बळी

राज्यात पावसाचा सपाटा सुरुच आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आज (21 ऑक्टोबर) एकाच दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय.

नाशिकमध्ये एकाच दिवसात 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, दोघांचा वीज पडून, तर एकाचा विजेच्या धक्क्याने बळी
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 21, 2020 | 9:03 PM
Share

नाशिक : राज्यात पावसाचा सपाटा सुरुच आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात आज (21 ऑक्टोबर) एकाच दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. यातील दोघांचा शेतात काम करताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर अन्य एका घटनेत कृषिपंप सुरु करण्यासाटी गेले असता विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झालाय (Three Farmer death in one day in Niphad Nashik).

श्रीरामनगर येथील स्मिता वसंत शिंदे, नांदुरडी येथील येथील भीमराव लक्ष्मण जगताप असं अंगावर वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. तसेच मनिषा माणिक दराडे यांचा चापडगावमध्ये कृषिपंप सुरु करण्यासाठी गेले असता विजेचा धक्का बसून मृत्यू झाला.

निफाडमधील श्रीरामनगर परिसरात दुपारी 3 वाजेच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला प्रारंभ झाला. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची कामगारांची प्रचंड धावपळ झाली. या धावपळीतच शेती काम करत असताना स्मिता वसंत शिंदे (वय 35) या महिलेचा विज पडून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, 2 मुलं, दिर, जावू, सासरे असा परिवार आहे. त्यांच्या या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दुसऱ्या एका घटनेत निफाडमधील नांदुर्डीत भीमराव लक्ष्मण जगताप (62) हे वस्तीजवळील आपल्या शेतात टोमॅटो पिकाला पावडर फवारणी करत होते. दुपारी 4 वाजेच्या दरम्यान विजांचा कडकडाट सुरु झाला आणि अचानक भीमराव यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पाऊस थांबल्यानंतर ते घरी आले नाही म्हणून घरातील लोक शेतात गेले असता शेतामध्ये भीमराव यांचा मृतदेह आढळला.

तिसऱ्या घटनेत निफाडमधील चापडगाव येथे मनिषा माणिक दराडे (33) या दुपारी 3.30 च्या दरम्यान शेतातील कृषिपंप सुरु करण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त 80 आर, बायकोचे दागिने गहाण, कर्ज कसं फेडू?, फडणवीसांसमोर बळीराजाचा टाहो

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

शेतकऱ्यानं सोयाबीनच्या पिकात सोडली जनावरं!, कापणीचा खर्चही निघणार नसल्यानं बळीराजा हतबल

व्हिडीओ पाहा :

Three Farmer death in one day in Niphad Nashik

Follow Us
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार