AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

W,W,W…! स्टीव्ह स्मिथने बांगलादेशविरुद्ध घेतली अनोखी हॅटट्रीक, कसोटी क्रिकेटमध्ये गाठलं अव्वल स्थान

ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा दुसरा दिवस संपला. या दिवसावर बांगलादेशने पकड मिळवली. असं असताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने या सामन्यात एक मोठी कामगिरी केली आहे.

W,W,W...! स्टीव्ह स्मिथने बांगलादेशविरुद्ध घेतली अनोखी हॅटट्रीक, कसोटी क्रिकेटमध्ये गाठलं अव्वल स्थान
W,W,W...! स्टीव्ह स्मिथने बांगलादेशविरुद्ध घेतली अनोखी हॅटट्रीक, कसोटी क्रिकेटमध्ये गाठलं अव्वल स्थानImage Credit source: Getty Images
| Updated on: Aug 14, 2026 | 4:38 PM
Share

Steve Smith Most Catches In Test: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेतील महत्त्वाचा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया सहज बाजी मारेल असं वाटलं होतं. पण तसं अजिबात घडताना दिसत नाही. बांगलादेशने कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांवर मजबूत पकड मिळवली आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथने एक मोठा कारनामा केला आहे. दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथने क्षेत्ररक्षणात एक मोठा पल्ला गाठला आहे. स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना त्याने एक अनोखी हॅटट्रीक पूर्ण केली आहे. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल पकडणाऱ्या नॉन विकेटकीपर फिल्डर म्हणून संयुक्तरित्या अव्वल स्थान गाठलं आहे.

स्टीव्ह स्मिथची झेल पकडण्याची हॅटट्रीक

बांगलादेशने 3 विकेट गमवून 297 धावा केल्या होत्या. त्यामुळे बांग्लादेश मजबूत स्थितीत होता. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी कमाल केली. बांगलादेशच्या 297 वरून 308 धावा होईपर्यंत तीन विकेट धडाधड पडल्या. तिन्ही फलंदाज या दरम्यान झेल बाद झाले. नजमुल हुसैन शांतो, लिट्टन दास आणि मुशफिकुर रहिम झेल बाद होत तंबूत परतले. विशेष म्हणजे या तिघांचे झेल स्टीव्ह स्मिथने पकडले. यासह त्याने मैदानात झेल पकडण्याची एक अनोखी हॅटट्रीक पूर्ण केली.

कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 होण्याचा मान

स्टीव्ह स्मिथने तीन झेल पकडल्यानंतर त्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 218 झेल झाला आहे. यासह त्याने इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूटची बरोबरी साधली आहे. जो रूटने 166 कसोटी सामन्यात 218 झेल पकडले. तर स्टीव्ह स्मिथने हाच कारनामा 124व्या कसोटी सामन्यात केला. स्टीव्ह स्मिथने आणखी एक झेल पकडला तर अव्वल एकटाच असणार आहे. कारण या कसोटी सामन्यात त्याला जो रूटला मागे टाकण्याची संधी आहे. आता फक्त एक झेल आणि अव्वल स्थानी एकट्याने विराजमान होण्याचा मान मिळेल.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे क्षेत्ररक्षक

  • स्टीव्ह स्मिथ 218 झेल
  • जो रूट 218 झेल
  • राहुल द्रविड 210 झेल
  • महेला जयवर्धने 205 झेल
  • जॅक कॅलिस 200 झेल

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...