अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते.

अतिवृष्टीग्रस्तांना गुरुवारी आर्थिक मदत जाहीर करणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

उस्मानाबाद: अतिवृष्टीमुळे गेल्या दहा दिवसांपासून हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्यसरकारकडून उद्या गुरुवारी आर्थिक मदत जाहीर होणार आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बळीराजाला दिली. (uddhav thackeray may announce relief package tomorrow for flood affected areas)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काटगाव येथे जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत महसूल मंत्री बाळासाहेब थोरातही होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मी आढावा घेतला आहे. मी इथे केवळ आकडे सांगायला आलो नाही. केवळ तुम्हाला बरे वाटावं म्हणून आकड्यांची फेकाफेक करणार नाही. आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तोपर्यंत 80 ते 90 टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं समाधान होईल अशी मदत तुम्हाला केली जाईल. तुमचं आयुष्य उभं करण्यासाठी आम्ही निर्णय घेऊ. तुमच्या सुखा समाधानासाठी जे जे करता येईल, ते मी करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मी जे बोलतो ते करतो. जे बोलत नाही. ते करत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तुमच्या भागात किती पाऊस झाला? असा पाऊस तुम्ही कधी पाहिला होता का? तुमच्या शेत पिकांचे पंचनामे झालेत का? अशी विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी आमच्या आयुष्यात आम्ही असा पाऊस पाहिला नाही. 8 ते 10 फूट पाणी होतं. त्यामुळे आमचं संपूर्ण शेत वाहून गेलं. ऊस, कांदा, कपाशी आणि द्राक्षंही नासली. साडेसात एकरावरील द्राक्षांपैकी साडेचार एकरावरील द्राक्षं वाहून गेली, असं सांगत एका शेतकऱ्याने हंबरडा फोडला. मुख्यमंत्र्यांनीही या शेतकऱ्याला धीर देत रडू नका. खचून जाऊ नका. मी आलोय ना. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्यासोबत आहोत. काळजी करू नका, असा धीरही त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

विद्यार्थीनीच्या अभ्यासाची विचारपूस

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरीच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचीही विचारपूस केली. अभ्यास सुरू आहे ना? ऑनलाइन शिक्षण आवडतं की शाळेत जायला आवडतं? ऑनलाइनवरून अभ्यास जमतोय ना? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी एका विद्यार्थीनीला विचारला. तिनेही ऑनलाइन अभ्यास आवडतो. पण शाळेत जायला आवडतं, असं सांगितलं. (uddhav thackeray may announce relief package tomorrow for flood affected areas)

संबंधित बातम्या:

केवळ तुम्हाला बरं वाटण्यासाठी आकड्यांची फेकाफेक करणार नाही, पण मदत नक्की करेन; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | धीर सोडू नका, हे सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे

(uddhav thackeray may announce relief package tomorrow for flood affected areas)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *