दोन वर्षांचा छकुला सात भाषांमध्ये शंभरपर्यंत अंक मोजतो

अतुल कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Jan 26, 2023 | 8:28 AM

साहेबांच्या देशातील एक बाळ चक्क सहा ते सात भाषांमध्ये अंक गणित बोलतंय हे पाहून तुमची बोटं तोंडात जातील. जगातील बुध्यांकांची  (आयक्यू )  नोंद ठेवणारी मेन्सा नामक सर्वात जुन्या आयक्यू सोसायटीने या बाळाच्या गुणांची दखल घेतली आहे.

दोन वर्षांचा छकुला सात भाषांमध्ये शंभरपर्यंत अंक मोजतो
TEDDY
Image Credit source: socialmedia

दिल्ली : आपल्याला बालपण आठवत असेल तर आपल्याला शिक्षकांनी अक्षरांची ओळख नीट करता येत नसल्याने खडसावल्याचे आठवत असेल. परंतू युके म्हणजेच इंग्लंडमधील साहेबांच्या देशातील एक बाळ चक्क सहा ते सात भाषांमध्ये अंक गणित बोलतंय हे पाहून तुमची बोटं तोंडात जातील. प्रतिभा कोणामध्ये उपजत असते, तर काही जण प्रयत्नांनी आपले कौशल्य वाढवत असतात. आता हेच पाहा ना एका चार वर्षीय छकुला जगातील बुध्यांक ( IQ ) मोजणाऱ्या मेन्सा ( Mensa ) या संघटनेचा सदस्य झाला आहे. या छोट्या बाळाने मातृभाषेसह सहा भाषेत अंकगणितांची मोजणी करण्याचा विक्रम केला आहे. या बाळाच्या प्रतिभेने साऱ्यांनाच आर्श्चयचकीत केले आहे.

लंडनचे टेडी नावाचे बाळ जगातील मेन्सा या आयक्यू मोजणाऱ्या संघटनेचे जगातील सर्वात तरूण सदस्य झाले आहे. हे बाळ केवळ 26 महिन्यांचे असतानाच त्याला टीव्ही पाहून अक्षरे उच्चारण्याची सवय लागली. मग पालकांनी त्याच्यातील ही प्रतिभा पाहून त्याला आणखी प्रोत्साहन दिले. मॅनडरीन सह सहा नॉन नेटीव्ह भाषेत त्याला अंकांची उजळणी येते.

View this post on Instagram

A post shared by BBC News (@bbcnews)

टेडीचे मित्र अजून वाचू शकत नाहीत हे त्यालाही आता समजू लागले आहे. त्याच्या या कलेला जपणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे,”असे टेडीची आई बेथ हॉब्स यांनी बीबीसीला बोलताना सांगितले आहे. तो केवळ 26 महिन्यांचा असताना टीव्ही स्क्रीनवरील उच्चारांना पाहून अक्षरांच्या आवाजाची कॉपी करून वाचायला शिकला, असेही त्या म्हणाल्या. आजची पिढी खूपच वेगवान आहे, आपल्याला त्याकाळात अक्षरांची तोंड ओळख होताना शिक्षकांचा किती मार बसायचा अशा प्रतिक्रीया सोशलमिडीयावर या बालकाचा व्हीडीओ पाहून येत आहेत. जगातील बुध्यांकांची  (आयक्यू )  नोंद ठेवणारी मेन्सा नामक सर्वात जुनी आयक्यू सोसायटीने या बाळाच्या गुणांची दखल घेतली आहे. या मेन्सा ही संघटनेची आयक्यू टेस्टची परीक्षा द्यावी लागते. ही टेस्ट पास होण्यासाठी 98 किंवा त्यापेक्षा अधिक मार्क मिळवावे लागतात.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI