AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूरमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना; कोळसा उत्खनन पुढील एक महिन्यासाठी बंद

शहरालगत असणाऱ्या पदमापूर कोळसा खाणीत ढिगाऱ्यातील माती कोसळल्याने कोळसा उत्खनन ठप्प झाले आहे. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, उत्खनन करणाऱ्या 3 मोठ्या ड्रिलींग मशीन ढिगाऱ्याखाली अडकल्याचा माहिती आहे.

चंद्रपूरमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना; कोळसा उत्खनन पुढील एक महिन्यासाठी बंद
| Edited By: | Updated on: Nov 18, 2020 | 11:23 PM
Share

चंद्रपूर : शहरालगत असणाऱ्या पदमापूर कोळसा खाणीत ढिगाऱ्यातील माती कोसळल्याने कोळसा उत्खनन ठप्प झाले आहे. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, उत्खनन करणाऱ्या 3 मोठ्या ड्रिलिंग मशीन ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. दुर्घटना झाल्यानंतर वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड या सरकारी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मातीचे ढिगारे खाणीशेजारी चुकीच्या पद्धतीने लावल्याने ही दुर्घटना झाली. (Accident at coal mine in Chandrapur; upto next month Coal mining will be closed)

चंद्रपूर शहरालगत पदमापूर कोळसा खाणीत कोळसा उत्खनन सुरु आहे. हे खोदकाम मोठ्या-मोठ्या यंत्रांच्या साहाय्याने केले जात आहे. यावेळी खोदण्यात आलेली माती खाणीशेजारी चुकीच्या पद्धतीने साठविण्यात आली. त्यामुळे मातीचे ढिगारे अचानक खाणीत कोसळायला सुरुवात झाली. माती कोसळत असल्याचे समजताच खाणीतील कामगार दुर्घटनास्थळाहून सुरक्षित ठिकाणी पोहोचले. मात्र, यावेळी तीन मोठ्या ड्रिलिंग मशीन मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. या अपघातामुळे पदमापूर कोळसा खाणीतील कोळसा उत्खनन पूर्णपणे ठप्प झाले. ही खाण प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या दुर्घटनेमुळे कोळशाचे खोदकाम ठप्प झाले असून, मोठे नुकसान होणार आहे. या दुर्घटनेची सरकारी कोळसा कंपनी वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून पाहणी सुरु आहे.  खाणीशेजारी असलेल्या नाल्याला वळविण्यात खाण प्रशासन अपयशी ठरल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

कोळसा खाणींमुळे चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणात वाढ

चंद्रपुरात असलेल्या कोळसा खाणी आणि वीज केंद्राच्या प्रदूषणामुळे चंद्रपूरच्या प्रदूषणात वाढच होत आहे. कोरोना काळात उद्योग बंद असल्याने चंद्रपूरसह महाराष्ट्राच्या प्रदूषणात 30 ते 55 टक्क्याने घट झाली होती. जानेवारी ते मार्च 2020 प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात चंद्रपूर व घुगुस या दोन शहराचा औद्योगिक शहरे प्रदूषित क्षेत्राच्या यादीत झळकली आहे.

सर्व प्रकारच्या वायू प्रदूषणात मुंबई आणि चंद्रपूर हे सर्वाधिक प्रदूषित विभाग ठरली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सन 2019-20 या वर्षाचा अहवाल जाहीर झाला आहे. मार्च महिन्यात देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रासह देशातील उद्योग बंद होते. रेल्वे, वाहतूक बंदी होती. त्यामुळं उद्योगांची चाकं थांबली. गाड्याची चाकं थांबली. यामुळे वातावरण ढवळून निघालं होतं. (Accident at coal mine in Chandrapur; upto next month Coal mining will be closed)

संबंधित बातम्या :

चंद्रपूर, गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासाठी सुमारे अडीच लाख निवेदने; मंत्रालयात हालचालींना वेग

चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, 6 महिन्यांपासून पगार नसल्याने तणाव

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोलीत पूर, गोसेखुर्द धरणातून विसर्ग कमी करणार, विजय वडेट्टीवारांची माहिती

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.