AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, 6 महिन्यांपासून पगार नसल्याने तणाव

चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला (Chandrapur Government Hospital Women Employee Died) आहे.

चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, 6 महिन्यांपासून पगार नसल्याने तणाव
| Updated on: Aug 05, 2020 | 4:53 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने ही महिला तणावाखाली होती. नवजात शिशू कक्षात काम करत असताना ही महिला अचानक कोसळली. त्या ठिकाणी कोणतेही तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने त्या महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करत मृताच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे. (Chandrapur Government Hospital Women Employee Died)

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात संगिता पाटील नावाची एक महिला कंत्राटी सहा यक पदावर काम करायची. काल (4 ऑगस्ट) नवजात शिशूच्या अतिदक्षता विभागात काम करत असताना ती अचानक खाली कोसळली. त्यानंतर तिला आयसीयूत दाखल करण्यात आले. पण रात्रभर एमडी, एमएस किंवा कोणतेही स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध झाले नाही. दुर्देवाने उपचाराअभावी तिचा मृत्यू झाला.

शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची ही परिस्थिती असेल तर इतर रुग्णांचे काय? असा सवाल कामगार उपस्थित करत आहेत. या दवाखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी स्पेशलिस्ट डॉक्टरला कॉल करूनही ते लवकर हजर होत नाहीत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न कंत्राटी कामगारांच्या संघटनेने केला आहे.

तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी रात्री स्पेशलिस्ट डॉक्टरांना कॉल केला का ? केला असेल तर डॉक्टर का आले नाही ? रूग्णावर तातडीने कोणते उपचार केले याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्हा आणि आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळे मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. पण या ठिकाणी वेळेवर स्पेशालिस्ट हजर होत नाहीत. एकीकडे कर्मचाऱ्यांना 6 महिन्यापासून पगार नसल्याने कौटुंबिक तणावात वावरावे लागत आहे. तर दुसरीकडे आणीबाणी व्यवस्थेत असलेले कर्मचारी कोविड काळात सातत्याने कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्याच कर्मचाऱ्यांना अपेक्षित उपचार देऊ शकत नसेल तर संबंधितांवर कारवाई करा. तसेच मृतकाच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.(Chandrapur Government Hospital Women Employee Died)

संबंधित बातम्या : 

पनवेलमध्ये खासगी रुग्णालयांकडून लूट, मनसेच्या तक्रारीची उपजिल्हाधिकाऱ्यांकडून दखल, आयुक्तांकडे कारवाईची शिफारस

खासदार नवनीत राणांच्या कुटुंबातील दहा जणांना कोरोना, मुलांनाही संसर्ग, सासू-सासऱ्यांवर नागपूरमध्ये उपचार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.