धक्कादायक; उत्तर प्रदेशात झोपेत असलेल्या तीन बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला; गुन्हा दाखल

सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागिरकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

धक्कादायक; उत्तर प्रदेशात झोपेत असलेल्या तीन बहिणींवर अ‍ॅसिड हल्ला; गुन्हा दाखल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Oct 13, 2020 | 12:03 PM

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या हाथरस इथं झालेलं सामूहिक बलात्कार प्रकरण अजून ताज असतानाच आणखी एक महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये तीन बहिणींवर अ‍ॅसिड फेकण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागिरकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. (acid attack on 3 dalit sisters in uttar pradesh )

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गोंडा इथं ही भयंकर घटना घडली आहे. तिन्ही बहिणी रात्री झोपल्या असताना त्यांच्यावर अ‍ॅसिड फेकण्यात आलं. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे पीडित बहिणी या अल्पवयीन आहेत. घटना घडताच तिघींनाही तात्काळ स्थानिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेती दोन बहिणींची प्रकृती स्थिर असून एक बहिण मात्र गंभीर आहे. तिच्यावर जास्त अ‍ॅसिड पडल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. दरम्यान, या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इतर बातम्या –

बिहार निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार ? संजय राऊतांनी सांगितलं सत्य

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

(acid attack on 3 dalit sisters in uttar pradesh )

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें