ज्येष्ठ नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांचं निधन

गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे साहित्य, कला, सिनेमा, नाट्य, सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील जाणकार आणि वडीलधारी व्यक्ती हरपला.

ज्येष्ठ नाटककार डॉ. गिरीश कर्नाड यांचं निधन
Follow us
| Updated on: Jun 10, 2019 | 10:38 AM

बंगळुरु : ‘ज्ञानपीठ’ विजेते लेखक, नाटककार आणि अभिनेते डॉ. गिरीश कर्नाड यांचं वयाच्या 81 व्या वर्षी बंगळुरुत निधन झालं. गेल्या अनेक दिवसांपासून गिरीश कर्नाड आजारी होते. गिरीश कर्नाड यांच्या निधनामुळे साहित्य, कला, सिनेमा, नाट्य, सामाजिक अशा अनेक क्षेत्रातील जाणकार आणि वडीलधारी व्यक्ती हरपला. साहित्य-कला क्षेत्रात जसे गिरीश कर्नाड यांचं भरीव योगदान आहे, तसेच त्यांनी सामाजिक क्षेत्रातही मोलाचं काम केलं. संवेदनशील आणि सामाजिक जाण असलेला लेखक, कलाकार म्हणून त्यांची ओळख होती.

रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे 19 मे 1938 रोजी गिरीश कर्नाड यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पुण्यात आणि त्यानंतर उच्च शिक्षण ऑक्सफर्ड येथील लिंकन कॉलेजमध्ये झालं. गणित आणि संख्याशास्त्रात बीए झाले. पुण्यात राहत असतानाच गिरीश कर्नाड यांच्यावर बालगंधर्व, किर्लोस्कर अशा नाटक कंपन्यांचे संस्कार झाले. शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.

गिरीश कर्नाड यांची सिनेक्षात्रातील कारकीर्दही मोठी आहे. सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ सिनेमात नुकतीच त्यांनी केलेली भूमिका अनेकांना आठवत असेल. मात्र, त्याआधाही कित्येक दशकांची गिरीश कर्नाड यांची कारकीर्द आहे. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबरीवर आधारित ‘वंशवृक्ष’ सिनेमाद्वारे कर्नाड यांनी दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. या सिनेमाला अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी अनेक कन्नड आणि हिंदी सिनेमांचे दिग्दर्शन केले.

उंबरठा, निशांत या मराठी सिनेमांचं दिग्दर्शन गिरीश कर्नाड यांनी केले असून, तुघलक, नागमंडल, ययाती, हयवदन अशा मराठी नाटकांचंही दिग्दर्शन त्यांनी केले आहे. तसेच, उत्सव, गोधुली असे हिंदी सिनेमेही विशेष गाजले.

साहित्यसेवेसाठी गिरीश कर्नाड यांना भारतीय साहित्य क्षेत्रातील मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भारत सरकारने गिरीश कर्नाड यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं आहे. तसेच, कालिदास सन्मान पुरस्कार, तन्वीर सन्मान पुरस्कार अशा पुरस्कारानेही कर्नाड यांचा गौरव झाला आहे.

गिरीश कर्नाड यांच्या सिनेमा आणि नाटकांसाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गिरीश कर्नाड यांना श्रद्धांजली :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.