‘सुनीत’ सोडून माझा कुणीच भाऊ नाही : सुबोध भावे

'सुनीत' सोडून माझा कुणीच भाऊ नाही : सुबोध भावे


मुंबई : सिनेकलाकारांना भेटवण्यासाठी किंवा एखाद्या टीव्ही-सिरियलमध्ये काम देतो असे सांगून पैसे उकळणाऱ्यांची काही कमी नाही. बहुधा, याचाच अनुभव प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यालाही आला आहे. सुबोधने फेसबुकने यासंदर्भात स्वतंत्र पोस्ट लिहून आवाहन केले की, “मला कुणी भेटवण्यासाठी पैसे मागितले तर विश्वास ठेवू नका.”

सुबोध भावनेने नेमके काय आवाहन केले आहे?

“माझा सख्खा भाऊ ‘सूनीत’ सोडून ‘भावे’ आडनाव लावणारा माझा कोणीही भाऊ नाही. आणि जर कोणी मला भेटवण्यासाठी पैसे किंवा अन्य मागणी करत असेल तर अशा कोणावरही विश्वास ठेऊ नका.” असे आवाहन सुबोध भावे याने फेसबुकवरुन आवाहन केले आहे.

अभिनेता सुबोध भावेला भेटवतो, असे सांगून पैसे उकळणाऱ्यांपासून सावध करण्यासाठी त्याने फेसबुकवर यासंदर्भात आवाहन केले आहे.

खरंतर सिनेकलाकारंच्या भेटीगाठी करुन देतो किंवा सिनेमा-मालिकांमधून काम देतो, असे सांगून अनेकजण फसवणूक करतात. तशी आतापर्यंत अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यामुळे अभिनेत्यांनीच चाहत्यांना सतर्कतेचं आवाहन करणं महत्त्वाचं आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाबाबतही अभिनेते आदेश बांदेकर नेहमी अशाप्रकारचे आवाहन करुन, कुणीही या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पैसे मागत असल्यास जवळील पोलिस ठाण्यात तक्रार दाकल करण्याचे आवाहन करत असतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI