Divyanka Tripathi | करण जोहरपासून दूर राहण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला दिव्यांका त्रिपाठीचे जोरदार प्रत्युत्तर!

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने देखील तिला आलेल्या अडचणींबद्दल ट्विट करत, ‘पॉवरगुल’ अनुभव शेअर केला होता.

Divyanka Tripathi | करण जोहरपासून दूर राहण्याचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला दिव्यांका त्रिपाठीचे जोरदार प्रत्युत्तर!
Harshada Bhirvandekar

|

Oct 13, 2020 | 2:20 PM

मुंबई : शहरात काल (12 ऑक्टोबर) वीज पुरवठा खंडित झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. तर, दुसरीकडे या प्रकरणावर नेटकऱ्यांनी तूफान ‘मीम्स’बाजी केली होती. मालिकांच्या जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Actress Divyanka Tripathi) देखील तिला आलेल्या अडचणींबद्दल ट्विट करत, ‘पॉवरगुल’ अनुभव शेअर केला होता. या ट्विटवर (Twitter) दिव्यांकाच्या एका चाहत्याने तिला वेगवेगळे सल्ले द्यायला सुरुवात केली. यात त्यांनी दिव्यांकाला करण जोहरपासून दूर राहण्यास देखील सांगितले. यावर दिव्यांकाने त्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. (Actress Divyanka Tripathi Slams A twitter User who advise her to stay away from karan johar)

दिव्यांकाचा ‘ट्विटर वॉर’

मुंबईसह अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने सर्वसामान्यांना प्रचंड त्रास झाला. तर, या ‘पॉवरगुल’चा फटका चित्रीकरणासाठी बाहेर पडलेल्या कलाकारांनादेखील बसला. ‘कामासाठी बाहेर पडलेले, आता बेकार आणि बेजार होऊन फिरतेय. कोणी सांगेल का मुंबईत वीज का गायब झालीय?’, अशा आशयाचे ट्विट करत अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने (Actress Divyanka Tripathi) आपला अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला होता.

दिव्यांकाच्या या ट्विटवर एका वापरकर्त्याने कमेंट करत म्हटले की, ‘एक दिवस विना मेकअप आणि विना एसी राहायला शिका दहिया मॅडम’.

आधीच वीजपुरवठा खंडित झाल्याने कामात अडकलेली दिव्यांका या कमेंटने चांगलीच वैतागली. त्या वापरकर्त्याला उत्तर देत दिव्यांकाने लिहिले की, ‘काका  उगाचच ‘हिरो’ बनण्याचा प्रयत्न करू नका. काम तर, सरकारी होते. यात मेकअपचा काहीच संबंध नव्हता. विशेष टिप्पणी अशी करता, जसे की तुम्ही ठीकठिकाणी ‘बिग बॉस’चे कॅमेरे लावले आहे. काही तरी चांगलं लिहा, आशीर्वाद द्या, नाहीतर फक्त कामापुरतेच बोला’. कडक शब्दांत दिव्यांकाने या वापरकर्त्याला टोला लगावला. (Actress Divyanka Tripathi Slams A twitter User who advise her to stay away from karan johar)

दिव्यांकाचे उत्तर पाहून या वापरकर्त्याने पुन्हा एकदा तिला सल्ला देण्यास सुरुवात केली. ‘माझा आशीर्वाद नेहमीच तुझ्याबरोबर आहे. चांगले चित्रपट कर. ड्रग्जच्या भानगडीत पडू नको. आणि चुकूनही करण जोहरकडे जाऊ नकोस’, असे या वापरकर्त्याने दिव्यांकाला उद्देशून म्हटले.

मी कमळ आहे आणि चिखलात ही कमळच राहीन!

यावर दिव्यांकाने पुन्हा उत्तर देत लिहिले की, ‘तुमचे हे बोलणे मला आवडले. आजकाल सगळेच एकमेकांना काही कारण नसतानाही चुकीचे समजतात. कलाकार कितीही खंबीर दिसत असला तरी त्याच्या मनालाही वेदना होतात. ज्या दिवशी वडिलांनी मला या शहरात सोडून भोपाळमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून त्यांची मान गर्वाने उंचावेल अशाच गोष्टी मी केल्या आहेत. मी कमळाप्रमाणे आहे आणि चिखलातही कमळासारखीच राहीन’. दिव्यांकाच्या या चोख प्रत्युत्तरानंतर मात्र तिच्या या चाहत्याने शांत बसणे उचित समजले. (Actress Divyanka Tripathi Slams A twitter User who advise her to stay away from karan johar)

(Actress Divyanka Tripathi Slams A twitter User who advise her to stay away from karan johar)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें